

नंदकिशोर गुर्जर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी
लोणीच्या भाजप आमदाराला घर बॉम्बने उडवण्याची धमकी
गाझियाबादमध्ये भाजप आमदाराला धमकीचा फोन
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. येथील लोणी विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार नंदकिशोर गुर्जर यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी मिळालीय. मिळालेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी त्यांना फोनवरून ही धमकी मिळाली; खुद्द आमदारांनीच या घटनेची माहिती दिली.
दरम्यान, धमकीचा फोन आल्यानंतर आमदाराच्या एका समर्थकाने लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. धमकी देणाऱ्या आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत.
या घटनेबाबत बोलताना आमदार नंदकिशोर गुर्जर म्हणाले, "रक्षाबंधनाच्या दिवशी मला एका व्यक्तीचा फोन आला. त्याने माझ्या घरात घुसून बॉम्बने घर उडवून देण्याची धमकी दिली. मी जेव्हा विचारले की कोण बोलत आहे, तेव्हा त्या व्यक्तीने त्याच सुरात बोलणे चालू ठेवले आणि शिवीगाळ केली. त्यानंतर मी फोन कट केला."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.