Bank Holiday List: उद्या बँकेत काम असेल तर थांबा! महाराष्ट्रासह अनेक राज्यांत बँका बंद

Bank Holidays 2026: ऑगस्टच्या शेवटच्या दिवसांत महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये बँका बंद असणार आहेत. सप्टेंबरमध्येही विविध सण आणि शनिवारमुळे बँकांना सुट्ट्या असून, शाखेत जाण्याआधी राज्यनिहाय हॉलिडे मॅट्रिक्स तपासा.
Bank Holiday List
Bank Holiday ListBank Holiday Listmeta ai
Published On

तुम्ही रोज बँकेचे व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आज २५ ऑगस्ट, मंगळवारी मिलाद-उन-नबी आणि पहिला ओणम या सणांमुळे केरळ आणि आंध्र प्रदेशातल्या काही ठिकाणी बँका बंद आहेत. मात्र, उद्या २६ ऑगस्टला महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यांमध्ये बँकांना सुट्टी आहे. त्यामुळे बँकेत महत्त्वाचे काम असल्यास सुट्टीची माहिती आधी तपासणं गरजेचं आहे.

२६ ऑगस्टला कुठे बँका बंद?

RBIच्या हॉलिडे मॅट्रिक्सनुसार ईद-ए-मिलाद आणि तिरुवोणममुळे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, तेलंगणा, मणिपूर, जम्मू- काश्मीर, उत्तर प्रदेश, केरळ, दिल्ली, बिहार, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यातल्या संबंधित बँकिंग केंद्रांमध्ये सुट्टी असेल.

Bank Holiday List
Raksha Bandhan Horoscope : सूर्य-गुरुची कृपा होणार, पैशांचा पाऊस पडणार; रक्षाबंधनानंतर 'या' 3 राशींचं नशीब पालटणार

२८ ऑगस्टला रक्षाबंधनाची सुट्टी

रक्षाबंधन यंदा २८ ऑगस्ट, शुक्रवारी आहे. या दिवशी गुजरात, मध्य प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, राजस्थान, जम्मू-काश्मीक, उत्तर प्रदेश, केरळ आणि हिमाचल प्रदेशामध्ये बँका बंद राहतील.

Bank Holiday List
Ladki Bahin Yojana : सण-उत्सव गोड होणार! लाडक्या बहिणींसाठी ३००० कोटी; फडणवीस सरकारचा शासन निर्णय

२९ ऑगस्टला बँका सुरू राहणार

ऑगस्टच्या शेवटच्या शनिवारी म्हणजेच २९ ऑगस्टला बँका सुरू राहतील. मात्र ३० ऑगस्ट रविवार असल्यामुळे बँका बंद असतील.

सप्टेंबरमध्येही बँकांना सुट्ट्या

सप्टेंबरमध्येही वेगवेगळे सण आणि प्रादेशिक कार्यक्रमांमुळे अनेक राज्यांमध्ये बँका बंद राहतील. ४ सप्टेंबरला जन्माष्टमी, तर १२ सप्टेंबरला दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय १४ आणि १५ सप्टेंबरला गणेश चतुर्थीशी संबंधित सुट्ट्या काही बँकिंग केंद्रांमध्ये आहेत. मुंबई-नागपूर, पुण्यासह काही प्रमुख केंद्रांमध्ये १४ सप्टेंबरची सुट्टी लागू आहे. २६ सप्टेंबरला चौथा शनिवार असल्यामुळे देशभरातल्या बँका शाखा बंद राहतील. त्यानंतर २७ सप्टेंबरला रविवारची सुट्टी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com