

यंदा रक्षाबंधन २८ ऑगस्ट रोजी साजरा केले जाईल. हा दिवस भावा-बहिणींच्या नात्याचा पवित्र सण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी ग्रह-नक्षत्रांची विशेष स्थिती तयार होत असून सूर्य आणि देवगुरू बृहस्पतीची मजबूत स्थिती काही राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतं. या काळात आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती, पैशाची वाढ, गुंतवणुकीत वाढ आणि कौटुंबिक सुख मिळण्याचे संकेत आहेत.
महत्त्वाचं म्हणजे, याच दिवशी वर्षातले दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार असल्याचंही नमूद केलं जातं. या ग्रहस्थितीचा प्रभाव काही राशींवर मोठ्या प्रमाणात पडू शकतो. चला जाणून घेऊयात कोणत्या राशींसाठी रक्षाबंधनानंतरचा काळ फायदेशीर ठरू शकतो.
मेष राशीच्या जातकांसाठी रक्षाबंधनाचा काळ सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. कुटुंबात शुभ किंवा मंगल कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मानसिक तणावातूनही दिलासा मिळू शकतो.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ करिअर आणि आर्थिक बाबतीत लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे कौतुक होऊन नवीन जबाबदारी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याचे संकेत आहेत.
धनु राशीचा स्वामी बृहस्पती असल्याने रक्षाबंधनानंतरचा काळ विशेष शुभ ठरू शकतो. मान-सन्मानात वाढ होण्यासोबतच कुटुंब आणि समाजातील प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते.
रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधल्यानंतर किंवा बांधून घेतल्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीची पूजा करावी. तसेच गरजू किंवा गरीब व्यक्तींना अन्नधान्य आणि वस्त्रांचे दान केल्यास शुभ फल मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
टीप: वरील राशीभविष्य हे ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून त्याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नये. साम टिव्ही याच्याशी समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.