गायक आणि यूट्यूबर अंकित बालियानची हत्या
४ शूटरनी अंकितवर गोळीबार केल्याची माहिती
दोन आरोपींचा यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मृत्यू
दोन आरोपींचा शोध सुरु
गायक आणि यूट्यूबर अंकित बालियान यांच्या हत्या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणातील दोन आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुमित आणि मोहित अशी या दोन्ही आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंकित बालियान बुधवारी संध्याकाळी सुमारे ६:४५ वाजता शामली कोतवाली परिसरातील एका जिममधून बाहेर पडला. तो आपल्या कारकडे जात असताना दोन मोटारसायकलींवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. गोळीबारात अंकित गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या हल्ल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये हल्लेखोर दोन दुचाकींवरून येताना आणि गोळीबार केल्यानंतर पळून जाताना दिसत असल्याचे सांगण्यात आले.
उत्तर प्रदेश पोलिसांच्या माहितीनुसार, ४ शूटरने मिळून अंकितची हत्या केली . याशिवाय दोन जणांनी हत्येपूर्वी रेकी केल्याचा संशय आहे. पोस्टमार्टम अहवालात अंकित यांच्या शरीरावर पाच गोळ्या लागल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी दोन गोळ्या डोक्यात लागल्या होत्या. हत्येनंतर उत्तर प्रदेश एसटीएफ आणि पोलिसांच्या विविध पथकांनी तपासाला वेग दिला.
शामलीसह गाझियाबादमधील लोनी, दिल्ली आणि सोनीपत परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. याच तपासातून आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना मदत झाली. अंकित यांचे वडील सतवीर सिंह यांच्या तक्रारीवरून चार अज्ञात हल्लेखोरांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चारही शूटर हरियाणातील हिसार आणि रोहतक परिसरातील रहिवासी असल्याचे तपासात समोर आले होते. त्यापैकी दोन आरोपी पोलिसांच्या कारवाईत ठार झाले असून, दोन आरोपींचा शोध सुरू आहे.या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.