

ठाण्यामध्ये लॉजवर नेऊन तरुणाने गर्लफ्रेंडची हत्या केली
ठाण्यातील जांभळी नाका परिसरात ही घटना घडली
प्रेमसंबंधाच्या संशयातून ही घटना घडली
आरोपीला पोलिसांनी अटक केली
ठाण्यामध्ये तरुणाने गर्लफ्रेंडची निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली. ठाण्यातील नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत जांभळी नाका परिसरात ही घटना घडली. आरोपी तरुण लॉजमध्ये गर्लफ्रेंडला घेऊन गेला. त्याठिकाी दोघांमध्ये भांडण झाले. वाद इतका टोकाला गेला की तरुाने गर्लफ्रेंडची हत्या केली. त्यानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेमुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, ठाण्यातील जांभळी नाका परिसरात असलेल्या एका लॉजवर घेऊन गेला. मंगळवार रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. आरोपीने लॉजवर नेऊन २३ वर्षीय गर्लफ्रेंडची हत्या केली. संध्या म्हस्के (२३ वर्षे) असं हत्या झालेल्या गर्फफ्रेंडचे नाव होते.तर नंदकिशोर गाडेकर (२७ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. नंदकिशोरने संध्याची हत्या केली आणि मृतदेह हॉटेलच्या रुममध्ये ठेवून पळ काढला. आरोपी सीसीटीव्हीत कैद झाल्याने या हत्येचा उलगडा झाला.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी नंदकिशोर गाडेकरविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. पोलिसांनी हत्या करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात पाठवला आहे. तरुणाला आपल्या गर्लफ्रेंडचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि रागाच्या भरात त्याने तिची हत्या केली.
पोलिसांनी सांगितले की, २१ तारखेला ५ वाजता हॉटेल महाराजा लॉजवर एका कपलने रूम बुक केली होती. रात्री साधारण १० वाजता तरुण रूम सोडून बाहेर निघून गेला. तिथल्या मॅनेजरने हटकले की तुमच्या सोबतच्या मॅडम कुठे आहेत? त्यावर त्याने मॅडम वॉशरूमला गेलात असं सांगून तो निघून गेला. तरुणी बाहेर आली नाही म्हणून तिथल्या स्टाफने रुमची बेल वाजवली. बेलचा रिप्लाय येत नव्हता म्हणून मॅनेजर आणि त्याने दरवाजा उघडला असता तर तरुणी मृतावस्थेत बेडवर पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. तरुणीजवळ असलेल्या आधारकार्डवरून तिची ओळख पटली. त्यानंतर तपासातून ही हत्या प्रेमसंबंधातून झाल्याचे उघड झाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.