Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला

Kalyan Police: कल्याणमध्ये तरुणीने बॉयफ्रेंडची निर्घृण हत्या केली. डोक्यात धारदार शस्त्राने वार करत तिने बॉयफ्रेंडला जागीच संपवलं. या घटनेनंतर ती कोलकात्याला पळून गेली.
Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला
Kalyan Crime NewsSaam Tv
Published On
  • कल्याणमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची हत्या केली

  • मृतदेह गोणीत भरून बाथरूममध्ये ठेवला

  • पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह २४ तास पाण्यात ठेवला

  • घरमालकाला व्हॉईस मेसेज पाठवून मृतदेहाची माहिती दिली

संघर्ष गांगुर्डे, कल्याण

कल्याणमध्ये गर्लफ्रेंडने बॉयफ्रेंडची सिनेस्टाईल हत्या केली. या भयंकर हत्याकांडाने कल्याण हादरले. बॉयफ्रेंडची हत्या करून मृतदेह गोणीत लपवला आणि गर्लफ्रेंड कोलकात्याला फरार झाली. पुरावे नष्ट करण्यासाठी तरुणीने बॉयफ्रेंडचा मृतदेह २४ तास पाण्यात ठेवला होता जेणे करून सडला जाईल. कोलकाताला गेल्यानंतर तिनेघरमालकाला व्हॉईस मेसेज पाठवत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची विनंती केली होती. या प्रकरणी कल्याण पोलिसांनी आरोपी तरुणीविरोधात गु्न्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणच्या मानपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मलंग रोड परिसरातील नीलकंठ सोसायटीमध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घर मालकाच्या माहितीनुसार, गेल्याकाही दिवसापासून फ्लॅट क्रमांक १०४ मधून पाणी बाहेर पॅसेजमध्ये वाहत असल्याची तक्रार इमारतीतील रहिवाशांनी घरमालक अजय पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी भाडेकरूंशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळत नसल्याने संशय अधिक बळावला.

Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला
Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

घरमालकाला आरोपी महिलेचा एक व्हॉईस मेसेज आला होता. या मेसेजमध्ये बॉयफ्रेंडची हत्या केल्याचे सांगत मृतदेह बाथरूममध्ये असल्याची माहिती देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. हा मेसेज मिळताच घरमालकाने तातडीने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी फ्लॅटची पाहणी केली असता बाथरूममध्ये गोणीत बांधलेला मृतदेह आढळून आला. प्राथमिक तपासात मृताच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच रक्ताचे डाग आणि इतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. हत्येनंतर आरोपी महिला कोलकात्याला गेल्याची माहिती तपासात समोर आली असून तिचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. या हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून मानपाडा पोलिस विविध अंगांनी तपास करत आहेत. प्रेमसंबंध, वैयक्तिक वाद की अन्य कोणते कारण याचा शोध पोलिस घेत असून या थरारक हत्याकांडामुळे कल्याण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Kalyan Crime: कल्याण हादरले! डोक्यावर वार करत तरुणीने बॉयफ्रेंडला संपवलं, मृतदेह गोणीत भरून २४ तास पाण्यात ठेवला
Crime : घर दाखवण्याच्या बहाण्याने झुडपात नेलं अन् ७ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार; शेजाऱ्याचं भयंकर कृत्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com