Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला

West Bengal Crime: पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन मुलीचं अपरहण करून तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आरोपी ऐवढ्यावर न थांबता त्यांनी तिची हत्या करून मृतदेह तलावात फेकला.
Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला
West Bengal CrimeSaam Tv
Published On
  • पश्चिम बंगालमध्ये अल्पवयीन मुलीव बलात्कार

  • आरोपीने बलात्कारानंतर पीडितेची हत्या केली

  • हत्येनंतर मृतदेह तलावात फेकला

  • पोलिसांनी दोन आरोपींना अटक तर तिसऱ्याला ताब्यात घेतलं

पश्चिम बंगालमध्ये १२ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मुलीचा मृतदेह तलावात फेकून देण्यात आला. या घटनेमुळे पश्चिम बंगाल हादरले आहे. ही घटना पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगना जिल्ह्यातल बरुईपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे. या घटनेचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ वर्षीय मुलगी शनिवारी संध्याकाळी घरातून भाजी खरेदी करण्यासाठी गेली होती. पण बराच तास झाले ती परत न आल्यामुळे कुटुंबीय चिंतेत आले. त्यांनी तिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. पीडित कुटुंबीयांनी आरोप केला की, ४ जण जबरदस्ती तिला आपल्या सोबत घेऊन गेले. रविवारी सकाळी घराजवळील एका तलावात तिचा मृतदेह आढळून आला. तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि तिचा मृतदेह तलावात फेकण्यात आला.

Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला
Delhi Crime: दिल्ली हादरली! १० वर्षांच्या मुलीची बलात्कार करून हत्या, मृतदेह जंगलात नेऊन फेकला

या घटनेची माहिती मिळताच परिसरात तणावाचे वातावरण आहे. गावातील नागरिकांचे म्हणणे आहे की, त्यांनी पीडित मुलीला काही संशयित लोकांसोबत पाहिले होते. या घटनेनंतर स्थानिकांनी रास्तारोको आंदोलन केले. तसंच सूर्यपूर रेल्वे स्थानकावर रेलरोको आंदोलन देखील केले. एक तास त्यांनी रेलरोको आंदोलन केले तर तब्बल ५ तास रास्तारोको केला. स्थानिकांनी आरोपींविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली.

Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला
Pune Crime: जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून गोळीबार; पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत दोन जणांना अटक केली. एका स्थानिक तरुणाला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. पीडित मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी गावकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

Crime: १२ वर्षीय मुलीचे अपहरण करून बलात्कार, हत्या करत मृतदेह तलावात फेकला
Crime: १३ वर्षीय भाचीचं अपरहण, शेतात नेऊन मामाकडून बलात्कार; नंतर गळा दाबून संपवलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com