Pune Crime: जमिनीच्या वादातून शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हाप्रमुखाकडून गोळीबार; पिस्तूल, ४ जिवंत काडतुसे जप्त

Shinde Sena Leader Firing: जमिनीच्या वादावरून शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. पोलिसांनी त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
Shinde Sena Leader  Firing:
Police seized a pistol and four live cartridges after an alleged firing incident involving a Shiv Senasaam tv
Published On
Summary
  • पुण्यातील सुस-नांदे रोडवर जमिनीच्या वादातून गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

  • शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गोळीबार आणि मारहाणीचा आरोप.

  • पोलिसांनी एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करून तपास सुरू केला आहे.

जमिनीच्या वादातून शिंदे गट जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आज गुरुवारी पहाटेच्या सुमारास सुस-नांदे रोडवरील बांधकाम साईटवर हा सर्व प्रकार घडला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. शिवसेना जिल्हाप्रमुख चांदोरे गोळीबार करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला आहे.

Shinde Sena Leader  Firing:
पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील ६ निरीक्षकांच्या बदल्या; कोणाची कुठे झाली पोस्टिंग? जाणून घ्या

शिंदे गटाचे जिल्हाप्रमुखांनी जमिनीच्या वादातून बाळासाहेब चांदेरे यांनी एकाला मारहाण करत जमिनीवर गोळीबार केला. बाळासाहेब चांदेरे हे एका व्यक्तीला मारहाण करताना आणि जमिनीच्या दिशेनं आपल्या बंदुकीतून गोळीबार करतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बुधवारच्या मध्यरात्री बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील सुस- नांदे रोडवरील पॅराडाईज बिल्डिंग समोरील लहुजी माळी यांच्या बांधकाम साइटवर हा प्रकार घडला.

आरोपी बाळासाहेब चांदेरे आणि जागा मालक लहुजी माळी यांच्यात जमिनीच्या ताब्यातून वाद सुरू आहे. या वादातूनच बाळासाहेब चांदेरे व त्यांच्यासोबत असलेले संदेश माने या दोघांनी लहुजी माळी यांच्या जमिनीवर उपस्थित असलेले राहुल सरकार, महबूब शेख आणि नागेश राठोड यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. बाळासाहेब चांदेरे यांनी राहुल सरकारला हाताने मारहाण करून जमिनीच्या दिशेने गोळ्या झाडल्या.

Shinde Sena Leader  Firing:
TET पेपर फुटी प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड; 3 आरोपींना ठोकल्या बेड्या

या प्रकरणी बावधन पोलिसांनी बाळासाहेब चांदेरेला ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्यायसंहितेच्या वेगवेगळ्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश राठोड रात्री राहुल प्रेम सरकार, मेहबूब हबीब शेख, विकास विजय पानसरे, वरद भोसले आणि कुणाल चाटे यांच्यासह भूमकर ब्रिज परिसरात भेटले.

त्यावेळी राहुल सरकार यांनी आपण सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या सुसगाव येथील बांधकाम साईटवर लक्ष ठेवण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यानंतर नागेश, राहुल आणि मेहबूब यांना यश जगताप व आदित्य मारणे यांनी स्कॉर्पिओमधून ओम पॅराडाईज बिल्डिंगसमोरील बांधकाम साईटवर सोडले. तेथे तिघे काही वेळ गप्पा मारत बसले होते.

त्यानंतर ते तिघे बांधकाम साईटबाहेर आले, त्यानंतर तेथे एक पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार आली. त्यातून आरोपी चांदेरे खाली उतरून बांधकाम साईटसमोर आला. त्यावेळी संबंधित जमिनीच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर चांदेरे याने राहुल सरकार यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर राहुल सरकार यांनीही प्रतिकार करत चांदेरेंच्या कानफट्यात लगावली.

त्यानंतर चांदेरे याने पँटच्या खिश्यातून काळ्या रंगाचे पिस्तूल बाहेर काढले. समोर पिस्तूल पाहताच नागेश राठोड, राहुल सरकार आणि मेहबूब शेख यांनी भीतीने पळ काढला. राहुल आणि मेहबूब हे स्मशानभूमीच्या दिशेने, तर नागेश राठोड महामार्गाच्या दिशेने धावले.ते काही अंतरावर गेल्यानंतर चांदेरे यांनी गोळीबार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com