TET पेपर फुटी प्रकरणाचं बिहार कनेक्शन उघड; 3 आरोपींना ठोकल्या बेड्या

Bhiwandi TET Paper Leak To Bihar : भिवंडीच्या चर्चित TET पेपर लीक प्रकरणात ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात आणखी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Bhiwandi TET Paper Leak To Bihar
TET PAPER LEAK CASE: BIHAR CONNECTION SURFACES, THREE MORE ACCUSED ARRESTED
Published On
Summary
  • भिवंडी TET पेपर फुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली.

  • तपासात या रॅकेटचे बिहार कनेक्शन उघड झाले आहे.

  • फरार आरोपी कपिल दहिया याला जम्मूमधून, तर सोनू सिंह आणि मिथुन सिंह यांना पटणा येथून ताब्यात घेण्यात आले.

फैय्याझ, शेख साम प्रतिनिधी

भिवंडी TET पेपर लीक प्रकरणाचा तपास वेगात सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने या प्रकरणात तीन नवीन आरोपींना अटक केली आहे. फरार आरोपी कपिल दहिया विरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. त्याला जम्मूमधून अटक करण्यात आली. तर या रॅकेटशी संबंधित असलेले सोनू सिंह आणि मिथुन सिंह या दोघांना बिहारमधील पटण्यातून ताब्यात घेण्यात आले. (Bhiwandi TET Paper Leak: Thane Police Arrest Three, Bihar Connection Emerges)

Bhiwandi TET Paper Leak To Bihar
TET Exam Update : TET ची परीक्षा लांबणीवर, तारीख आली समोर; 'या' महिन्यात होण्याची शक्यता

तपासात समोर आलंय की, अटक केलेले दोन्ही आरोपी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता यांचे निकटचे साथीदार आहेत. पटन्यात बिजेंद्र गुप्ताच्या एका महत्त्वाच्या बैठकीला शिवम सिंह आणि मिथुन सिंह हे देखील उपस्थित होते. त्यानंतरपासूनच आम्ही त्यांचा शोध घेत होतो. आता रॅकेटचे धागेदोरे अधिक स्पष्ट होणार आहेत.

सध्या अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना काही वेळातच भिवंडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे. पोलिस त्यांची कोठडीची मागणी करणार आहेत. पोलिसांच्या तपासात असा संशय आहे की या तिघांच्या चौकशीत TET पेपर लीक रॅकेटमधील आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे. या रॅकेटचे जाळे किती खोलवर पसरले आहे हे लवकरच उघड होईल. TET पेपर फुटी प्रकरणात पोलिसांनी जाळे आवळायला सुरुवात केली आहे. मुख्य आरोपीचा साथीदार आता पोलिसांच्या ताब्यात आहे.

Bhiwandi TET Paper Leak To Bihar
NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

TET ची परीक्षा लांबणीवर, तारीख आली समोर

TET परीक्षेप्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ही परीक्षा आता नव्याने सप्टेंबरपर्यंत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यावेळेस कोणतीही हलगर्जी न करता परीक्षा पार पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. TET पेपर फुटी प्रकरणानंतर नवीन प्रश्नपत्रिका तयार करणे, त्यांची पडताळणी करणे तसेच सुरक्षा निकषांची पूर्तता करणे या सर्व प्रक्रियेला अडीच ते तीन महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com