कल्याण जेलमध्ये थरकाप! कैद्याला पोलिसांकडून बेदम मारहाण; पायाला 16 टाके

inmate beaten by jail police in Kalyan Adharwadi jail: कल्याणमधील आधारवाडी कारागृहात कैद्याला पोलिसांकडून मारहाण केल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जखमी कैद्यावर जेजे रुग्णालयात उपचार सुरू असून पायाला १६ टाके पडल्याची माहिती मिळतेय.
Injured inmate undergoing treatment at JJ Hospital after alleged assault by jail staff in Kalyan Adharwadi Jail.
Injured inmate undergoing treatment at JJ Hospital after alleged assault by jail staff in Kalyan Adharwadi Jail.saam tv
Published On

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

बदलापूर येथील एका प्रकरणात अटकेत असलेला अक्षय कुरतडकर हा तरुण सध्या आधारवाडी कारागृहात बंद आहे. त्याला जेलमधील दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अक्षय कुरतडकर जेलमध्ये असताना तो आंघोळ करून परत बैरकच्या दिशेने येत असताना दोन पोलिस कर्मचाऱ्यांनी त्याला अडवून मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर मुंबईतील जेजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या पायाला १६ टाके पडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अक्षयच्या मावशी यांनी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात जेल प्रशासनाचा संबंधित विभागाला याची तक्रार करण्यात आली आहे. या घटनेमुळे कारागृह प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Injured inmate undergoing treatment at JJ Hospital after alleged assault by jail staff in Kalyan Adharwadi Jail.
Pune : ३ पानांची सुसाईड नोट आणि व्हिडिओने खळबळ! धंगेकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप आक्रमक; म्हणाले, तोंड लपवून...

डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण ,हायकोर्टाच्या आदेशानंतर नगरसेवक रमेश म्हात्रे विष्णुनगर पोलिसांत शरण

डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी शिंदे शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली आहे.

Injured inmate undergoing treatment at JJ Hospital after alleged assault by jail staff in Kalyan Adharwadi Jail.
बहिणीने प्रेमविवाह केला म्हणून भररस्त्यात मेव्हण्याला कारने उडवले, मग हॉकी स्टिक, लोखंडी पाइप अन् दांडक्यांनी बेदम मारहाण

या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला होता. तसेच न्यायालयाने रमेश म्हात्रे यांनी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण यावे, असे स्पष्ट निर्देश दिले होते. न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यांची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही न्यायालयाने दिला होता.

Injured inmate undergoing treatment at JJ Hospital after alleged assault by jail staff in Kalyan Adharwadi Jail.
Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

त्या पार्श्वभूमीवर रमेश म्हात्रे आज विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात हजर करण्यात आले होते त्यांना कल्याण कोर्टाने ३ ऑगस्ट पर्यंत १४दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com