Nagpur : नागपुरमध्ये भीषण अपघात! ई-रिक्षा उलटून महिलेचा मृत्यू, नवऱ्याविरोधात पोलिसांची कारवाई

Nagpur News : नागपूरच्या कन्हान परिसरातील तारसा रोडवर ई-रिक्षा पलटून शीतल पाटील यांचा मृत्यू झाला. हेडलाइट बंद पडल्याने झालेल्या या अपघातानंतर पती अंकित पाटील यांच्याविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल.
KANHAN E-RICKSHAW ACCIDENT: WOMAN DIES AFTER VEHICLE OVERTURNS, HUSBAND BOOKED IN NAGPUR
KANHAN E-RICKSHAW ACCIDENT: WOMAN DIES AFTER VEHICLE OVERTURNS, HUSBAND BOOKED IN NAGPURSaam Tv
Published On
Summary
  • नागपूरमध्ये ई-रिक्षा पलटून शीतल पाटील यांचा मृत्यू

  • चालकाचे नियंत्रण सुटून दुर्घटना

  • चालकही गंभीर जखमी असून उपचार सुरु

  • पतीविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूरच्या कन्हान परिसरातील तारसा रोडवरील निलज शिवारात शुक्रवारी रात्री झालेल्या दुर्दैवी अपघातात ई-रिक्षाखाली दबून एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप ठेवत पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत असून परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंकित भारत पाटील हे ई-रिक्षा चालवत होते. त्यांच्या सोबत पत्नी शीतल पाटील प्रवास करत होत्या. रात्रीच्या वेळी तारसा रोडवरील निलज शिवारातून जात असताना ई-रिक्षाचा हेडलाइट अचानक बंद पडला. अंधारामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ई-रिक्षा रस्त्याच्या कडेला जाऊन पलटली.

KANHAN E-RICKSHAW ACCIDENT: WOMAN DIES AFTER VEHICLE OVERTURNS, HUSBAND BOOKED IN NAGPUR
Healthy Life : रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रोल करण्याची सवय आहे? शरीराचे काय होते जाणून हादरून जाल

या अपघातात शीतल पाटील या ई-रिक्षाखाली दबल्या गेल्या. त्यांना गंभीर दुखापती झाली. अपघातानंतर स्थानिकांच्या मदतीने दोघांनाही तातडीने कन्हान प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी शीतल पाटील यांना मृत घोषित केले. दरम्यान, चालक अंकित पाटील यांनाही डोके, कंबर आणि पायाला दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

KANHAN E-RICKSHAW ACCIDENT: WOMAN DIES AFTER VEHICLE OVERTURNS, HUSBAND BOOKED IN NAGPUR
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात वाहन निष्काळजीपणे चालवल्यामुळे अपघात घडल्याचे समोर आल्याने अंकित भारत पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम 281, 106(2) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून कन्हान पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com