Alisha Khedekar
वारंवार एकाच ठिकाणी पिंपल येणे हे हार्मोन्समधील बदलांचे लक्षण असू शकते, विशेषतः किशोरवयीन आणि महिलांमध्ये.
त्वचेत जास्त तेल तयार झाल्यास छिद्रे बंद होतात आणि त्याच भागात पुन्हा पुन्हा पिंपल्स येऊ शकतात.
त्वचेवरील बॅक्टेरिया वाढल्याने सूज निर्माण होते आणि एकाच जागी वारंवार पिंपल्स दिसू लागतात.
मोबाईल, उशीचे कव्हर किंवा हात वारंवार चेहऱ्याला लागल्यास जंतूंचा संसर्ग वाढू शकतो.
अतिरिक्त तेलकट, गोड किंवा प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्याने त्वचेच्या समस्या आणि पिंपल्स वाढू शकतात.
पिंपल्स वारंवार होत असल्यास घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.