Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! भररस्त्यात तरुणाचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Navi Mumbai Crime News : नवी मुंबईतील सीवुड सेक्टर-१५ येथील डीमार्टजवळ अज्ञात तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. NRI पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
NAVI MUMBAI SHOCKER: UNIDENTIFIED YOUTH FOUND DEAD NEAR SEAWOODS D-MART, MURDER PROBE UNDERWAY
NAVI MUMBAI SHOCKER: UNIDENTIFIED YOUTH FOUND DEAD NEAR SEAWOODS D-MART, MURDER PROBE UNDERWAYSaam Tv
Published On
Summary
  • नवी मुंबईत धक्कादायक घटना

  • सीवुड सेक्टर-१५ येथील डीमार्टजवळ अज्ञात तरुणाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळला

  • जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तरुणाला मृत घोषित केले

  • पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

नवी मुंबई, विकास मिरगणे

नवी मुंबईतून धक्कादायक घटना घडली आहे. सीवुड सेक्टर-१५ येथील डीमार्टजवळ रात्री एका अज्ञात तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील रक्तबंबाळ मृतदेह आढळून आला. जखमी तरुणाला तातडीने रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. NRI पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. या घटनेनं परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नवी मुंबईतील सीवुड सेक्टर-१५ येथील डीमार्टजवळ रात्री एका अज्ञात तरुणाचा अर्धनग्न अवस्थेतील रक्तबंबाळ मृतदेह आढळला. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमी तरुणाला रुग्णलयात उपचारासाठी दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. घटनेची गांभीर्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने तपास सुरु केला.

NAVI MUMBAI SHOCKER: UNIDENTIFIED YOUTH FOUND DEAD NEAR SEAWOODS D-MART, MURDER PROBE UNDERWAY
Skin Care : चेहऱ्यावर एकाच जागी वारंवार पिंपल येतोय? यामागे असू शकते 'हे' गंभीर कारण; वेळीच व्हा सावध

तपासादरम्यान पोलिसांना मृत तरुण जवळच असलेल्या एका जीर्ण इमारतीत राहत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी त्या ठिकाणी पाहणी केली असता मृताचा शर्ट तसेच नशेसाठी वापरले जाणारे व्हाइटनर आढळून आले. हे साहित्य जप्त करण्यात आले आहे. मृत तरुणाची ओळख अद्याप पटलेली नसून त्याच्या पार्श्वभूमीची माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे.

NAVI MUMBAI SHOCKER: UNIDENTIFIED YOUTH FOUND DEAD NEAR SEAWOODS D-MART, MURDER PROBE UNDERWAY
Snake Facts : सापांना कान नाहीत, मग ते आवाज कसे ऐकतात? ९९ टक्के लोकांना याबद्दल माहिती नाही

दरम्यान, हत्या नेमकी घटनास्थळीच झाली की अन्य ठिकाणी खून करून मृतदेह येथे आणून टाकण्यात आला, याचाही पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे आणि पोलीस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या धक्कादायक घटनेमुळे सीवुड परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com