Pune : ३ पानांची सुसाईड नोट आणि व्हिडिओने खळबळ! धंगेकरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर भाजप आक्रमक; म्हणाले, तोंड लपवून...

Ravindra Dhangekar, Khalil Shaikh Suicide Case : पुण्यातील बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात धंगेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणावरून राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे.
Ravindra Dhangekar News
Ravindra Dhangekar News
Published On

Former MLA Ravindra Dhangekar faces legal action : बांधकाम व्यावसायिक खलील शेख आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर १२ जणांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रवींद्र धंगेकर नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. दुसऱ्या बाजूला, धंगेकर यांच्यावतीने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेण्यात आली आहे. या सगळ्यावर आता भाजप ने मात्र महायुती मधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्यावर टीका केली आहे. खलील शेख प्रकरणातील आरोपी आज भूमिगत आहेत हे निषेधार्य आहे. आज त्या कुटुंबीयांना धीर देण्याचं काम करण्याची गरज असताना पळून जाणे चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया भाजप चे पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत स्वारगेट पोलीस ठाण्यात रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नीसह एकूण १४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि इतर संबंधित कलमांनुसार हा गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपासाच्या अनुषंगाने संबंधितांची भूमिका तपासली जात आहे.

सुसाईड नोट आणि व्हिडिओमुळे प्रकरण आले समोर

पुण्यातील गुलटेकडी भागात राहणाऱ्या बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी गुरवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. आर्थिक व्यवहार आणि थकीत पैसे न मिळाल्यामुळे कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी काही व्हिडिओ शूट करून ठेवले ज्यामध्ये त्यांना आत्महत्या करण्याची वेळ कशामुळे आली याबद्दल सांगितलं. या व्हिडिओ मध्ये त्यांनी पुण्यातील व्यावसायिकांसोबत केलेल्या व्यवहाराबद्दल उल्लेख केला आणि थकीत पैसे येत नसल्यामुळे आत्महत्या करत असल्याचं सांगितलं. त्यांनी होत असलेल्या कथित मानसिक त्रासाबाबत बोलताना अनेक व्यक्तींची नावे घेत त्यांच्यावर गंभीर आरोप केले. इतकचं नाही तर ३ पानांची सुसाईड नोट सुद्धा लिहली ज्यामध्ये त्यांनी कुठल्या व्यक्तीकडून किती पैसे येणे बाकी आहेत असा उल्लेख केला.

Ravindra Dhangekar News
भाडेकरू घर रिकामं करत नाहीये? नव्या कायद्यानुसार 'या' ५ कारणांवरून मालक थेट बाहेर काढू शकतात; पाहा काय आहेत नियम

पळून जाणं चुकीचे, भाजपची टीका

काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी भाजप मधील अनेक नेत्यांच्या विरोधात कठोर आणि स्पष्ट भूमिका मांडणाऱ्या रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी पळून जाणं चुकीचे असल्याची प्रतिक्रिया भाजप ने आता दिली आहे.

भाजप चे पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बिडकर माध्यमांशी बोलताना म्हणाले,"खलील शेख प्रकरणातील आरोपी आज भूमिगत आहेत हे निषेधार्य आहे. आज त्या कुटुंबीयांना धीर देण्याचं काम करण्याची गरज असताना पळून जाणे चुकीचे आहे. ते किती दिवस कायद्याला चकवतील, पळून जाणे ते चुकीचे आहे, जे देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर बोलत होते आज ते आज तोंड लपवत आहेत."

Ravindra Dhangekar News
निसर्गाचा तांडव! नागालँडमध्ये एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्या; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

रवींद्र धंगेकर यांच्याकडून न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

याप्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांच्या पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. एकाबाजूला पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असला तरी सुद्धा धंगेकर यांनी त्यांच्या आणि पत्नीची अटक टाळावी म्हणून पुणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनाचा अर्ज केला आहे. त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे पूर्ण शहराच्या राजकीय तसेच बांधकाम क्षेत्रात मोठी चर्चा सुरू असून, आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतील आरोप, पोलिस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

Ravindra Dhangekar News
Pune BJP : उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का, विश्वासू शिलेदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com