Pravin Dongre joins BJP in Pune : एका बाजूला शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरू आहे पण दुसरीकडे आता भाजपमध्ये "शांतीत क्रांती" करत इन्कामिंग सुरू आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार आहे. पुणे शहरात आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री चंद्रकांत पाटील आणि मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीमध्ये पुणे शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीत एस आर आय, बी एल ओ पदवीधर मतदार संघ यांच्याबाबत चर्चा झाली.
यात बैठकीदरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवाजीनगर मतदार संघातून विभाग प्रमुख राहिलेले आणि नुकतीच पुणे महानगरपालिका काँग्रेस पक्षाकडून लढवलेले प्रवीण डोंगरे यांनी रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात तसेच रस्त्यावरच्या लढाईमध्ये तसंच अनेक आंदोलनात ते शिवसेनेकडून सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते.
पक्षप्रवेशानंतर बोलताना प्रविण डोंगरे म्हणाले, "देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्यातील नेतृत्व मुरलीधर मोहोळ आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विकासाभिमुख कामांमुळे प्रेरित होऊन मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहे. माझा जन्म ज्या भागात झाला, त्या भागातील प्रत्येक नागरिकाच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शिवाजीनगरच्या सर्वांगीण विकासासाठी मी पूर्ण ताकदीने काम करणार आहे." या पक्षप्रवेश सोहळ्यास भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.