निसर्गाचा तांडव! नागालँडमध्ये एकापाठोपाठ एक दरडी कोसळल्या; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण ढिगाऱ्याखाली

Nagaland Mon district landslide latest news : नागालँडच्या मोन जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
Nagaland Landslides
Nagaland Landslides
Published On

Nagaland rain Landslides Death : नागालँडमधील मान (Mon) जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे निसर्गाचे भीषण रूप पाहायला मिळाले. मान जिल्ह्यात एकापाठोपाठ एक अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याची (Multiple Landslides) धक्कादायक घटना घडल्या. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १२ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून तात्काळ मदतकार्य सुरू कऱण्यात आले आहे.

नागालँडमधील स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, डोंगराचा मोठा भाग खचून रस्त्यावर आल्यामुळे अनेक वाहने ढिगाऱ्याखाली गाडली गेली. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने (NDRF/SDRF) घटनास्थळी धाव घेत युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केले आहे. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आतापर्यंत ८ जणांना आपला जीव गमावावा लागलाय. पण परिस्थिती पाहाता मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

नागालँडच्या मोन जिल्ह्यात रविवारी मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनात आठ जणांचा मृत्यू झाला. तर १२ जण जखमी झाले आहेत. मोनचे उपायुक्त वेन्येई कोन्याक यांनी एएनआयला सांगितले की, आतापर्यंत ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इतर ४ मृतदेह अजूनही ढिगाऱ्याखाली आहेत. काहीजण आणखी ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे.

Nagaland Landslides
Pune Traffic : पुण्याची वाहतूककोंडी कायमची संपणार, ३ नव्या उन्नत मार्गाचं भूमिपूजन; पाहा कोणता मार्ग कुठून जाणार?

भूस्खलनाच्या घटनांमध्ये मोन शहर आणि तिझिट हे सर्वाधिक प्रभावित भाग आहेत. मुसळधार पाऊस पहाटे १ वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. सकाळी ६-७ वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाच्या घटनांची माहिती मिळाली, असे कोन्याक यांनी सांगितले. राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ), पोलीस, आसाम रायफल्स, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि स्थानिक रहिवाशांची पथके शोध आणि बचाव कार्यात सहभागी झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

Nagaland Landslides
Pune BJP : उद्धव ठाकरेंना पुण्यात मोठा धक्का, विश्वासू शिलेदाराचा कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश

भूस्खलनामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार अनेक घरांना फटका बसला आहे. बचाव आणि मदतकार्य करण्यासाठी आसाम रायफल्स, एनडीआरएफ आणि नागालँड पोलिसांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी आणि बंद झालेले रस्ते मोकळे करण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस, वॉर्ड युनियन आणि स्थानिक रहिवासी एकत्रितपणे काम करत आहेत.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) संपूर्ण आठवडाभर ईशान्य भारतात सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याने, अधिकाऱ्यांनी संवेदनशील भागांतील लोकांना सतर्क राहण्याचा आणि अधिकृत सूचनांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

Nagaland Landslides
IMD Red Alert : महाराष्ट्रातही पाऊस धुमाकूळ घालणार? 'या' राज्यांना IMD चा मोठा इशारा, पाहा तुमच्या शहरात काय होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com