IMD Weather Forecast Maharashtra Rain Alert : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) उत्तर भारतासाठी अतिवृष्टीचा 'रेड अलर्ट' (Red Alert) जारी केला असून हिमाचल प्रदेश आणि ईशान्य भारतातील राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
उत्तर भारतातील या बदलत्या हवामानाचा आणि पश्चिमी चक्रावाताचा (Western Disturbances) थेट परिणाम आता महाराष्ट्राच्या हवामानावरही होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील काही भागांत ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. पुढील ४८ तासांत राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) सोमवारसाठी हिमाचल प्रदेशच्या काही भागांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला आहे. अतिवृष्टी, अचानक येणारे पूर आणि भूस्खलनाचा इशारा दिला आहे. उत्तर, पूर्व आणि ईशान्य भारतातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. बऱ्याच भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पाऊस अपेक्षित आहे.
IMD चा अंदाज काय ? कुठे कोसळणार पाऊस?
भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीरमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, तर हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. देशाच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गडगडाटी वादळे अपेक्षित असून, काही तुरळक ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
राज्यातील काही भागात ३ दिवस तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे. पूर्व विदर्भ आणि मराठवड्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र चांगल्या पावसाची शक्यता आहे. पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, वाशीम, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे व अहिल्यानगर जिल्ह्यांत वाऱ्याच्या ताशी वेगात वाढ होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.