Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, अचानक पोलिसांनी धाड; २८ तरुणी अन् १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं

Noida Crime News: नोएडामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली. एकाच वेळी ४ स्पा सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. २८ तरुणी अन् १५ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, अचानक पोलिसांनी धाड; २८ तरुणी अन् १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं
Noida Crime NewsSaam Tv
Published On
  • ग्रेटर नोएडा स्पा सेंटरवर पोलिसांची धाड

  • स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री रॅकेट

  • मानवी तस्करी विरोधी पथकाची कारवाई

  • नोएडा पोलिसांची मोठी कारवाई

  • ग्रेटर नोएडा गुन्हे ताज्या बातम्या

ग्रेटर नोएडा येथे मोठी कारवाई करण्यात आली. ४ स्पा स्टेटरवर एकाच वेळी छापा टाकण्यात आला. मानवी तस्करी विरोधी पथक आणि महिला पोलिसांनी ही कारवाई केली. यावेळी २८ तरुणी आणि १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडण्यात आलं. बीटा- २ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईट- ४ येथील एका इमारतीमध्ये हा छापा टाकण्यात आला. स्पा स्टेंटरच्या नावाखाली याठिकाणी सेक्स रॅकेट चालवले जात होते. याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांना स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आणि एका सामाजिक सेवा संस्थेकडून आलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई करण्यात आली. पोलिसांची धाड पडताच एकच गोंधळ उडाला आणि सर्वजण पळू लागले. अधिकाऱ्यांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला आणि सर्व स्पा सेंटरची तपासणी करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी अनेक तरुण आणि तरुणींना नको त्या अवस्थेत पकडलं.

Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, अचानक पोलिसांनी धाड; २८ तरुणी अन् १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं
Shocking : संतापजनक! भररस्त्यात महिला कॉन्स्टेबल समोरच अश्लील हावभाव, तरुणाने प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्...

या कारवाईत पोलिसांनी २८ तरुणींची सुटका करण्यात आली. १५ तरुणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात आणले आहे. महिला सुरक्षा विभागाच्या डीसीपी सुनीती यांनी सांगितले की, तपासाच्या निष्कर्षांनुसार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाईल. अटक करण्यात आलेल्या तरुणांपैकी काही जण स्पाचे ग्राहक असून काही जण कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, अचानक पोलिसांनी धाड; २८ तरुणी अन् १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं
Nanded News: शिक्षकाची २ मुलांसह सामूहिक आत्महत्या; व्हॉट्सअ‍ॅपवर स्टेटस ठेवला, नंतर कारमध्ये बसून ती नदीत घातली

एसीपी प्रशाली गंगवार यांच्या नेतृत्वाखालील मानवी तस्करी विरोधी पथकाने शनिवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास पोलिस दलासह बीटा २ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील साईट फोर जवळील इमारतीवर पोहोचले. या इमारतीच्या तळमजल्यावर अनेक स्पा केंद्रे कार्यरत आहेत.तिथे अनेक लोक फिरताना दिसले. पथकाला पाहताच स्पा सेंटरच्या आजूबाजूचे लोक अचानक दूर जाऊ लागले. पथकाच्या सदस्यांनी इमारतीत कार्यरत असलेल्या स्पा सेंटर चालकांच्या कागदपत्रांची तपासणी करण्यासह विविध चौकशी केली. चौकशीदरम्यान, स्पा केंद्रांमधून ताब्यात घेतलेल्या तरुणी तिथे उपस्थित असण्याचे समाधानकारक कारण देऊ शकल्या नाहीत.

Shocking: स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट, अचानक पोलिसांनी धाड; २८ तरुणी अन् १५ तरुणांना नको त्या अवस्थेत पकडलं
Shocking : साताऱ्यात भयंकर घडलं! आगीच्या भट्टीत कामगाराने उडी मारली, धक्कादायक कारण समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com