

नांदेडमध्ये शिक्षकाने दोन मुलांसह केली आत्महत्या
व्हॉट्सअप स्टेटस ठेवून शिक्षकाने संपवलं आयुष्य
गोदावरी नदीत कार घालून केली आत्महत्या
नांदेड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक म्हणून होते कार्यरत
नांदेडमध्ये एकाच कुटुंबातील ३ जणांनी सामूहिक आत्महत्या केली. या घटनेमुळे नांदेड हादरले आहे. जिल्हा परिषद शिक्षकाने आपल्या २ मुलांना सोबत घेऊन आत्महत्या केली. व्हॉट्सअॅपवर स्टेट्स ठेवत नंतर कारमध्ये तिघे बसून शिक्षकाने कार थेट नदीपात्रात घातली. या घटनेत कारमध्येच गुदमरून तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या त्रासाला कंटाळून या शिक्षाकाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या नांदेड पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅपला स्टेट्स ठेऊन २ मुलांसह जिल्हा परिषदेच्या शिक्षकाने वरिष्ठांना दोष देत आत्महत्या केली. नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील आमदुरा गोदावरी नदी पात्रात कार घालून या शिक्षकाने चिमुकल्यासह जीवनयात्रा संपवली. सुनील मोरे असं आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून ते हिमायतनगरच्या पोटा बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कर्तव्यावर होते. त्यांच्या आत्महत्येमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. एसडीआरएफच्या पथकाने कार आणि कारमधील तिघांचे मृतदेह नदीपात्रा बाहेर काढले आहेत. सुनील मोरे यांनी हदगाव गट शिक्षणाधिकारी आणि केंद्रप्रमुखाच्या जाचाला कंटाळलो असल्याचे व्हॉट्सअॅपवर स्टेटस ठेवलं. भोकर तालुक्यातील बेंबर गावचे शिक्षक सुनील मोरे हे मूळ रहिवासी होते. त्यांच्या मुलीचे सारा असं नाव असून मुलाचे नाव सुमित असे होते. या घटनेने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून एका जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी आपल्या चिमुकल्या मुलांसह आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.