

बदलापूरमध्ये एका महिलेने उल्हास नदीत उडी मारली
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
पाण्याच्या प्रवाहासोबत महिला वाहून गेली
महिलेने आत्महत्या का केली यामागचे कारण अस्पष्ट
बदलापूरमध्ये एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. उल्हास नदीमध्ये उडी मारून या महिलेने आयुष्य संपवलं. आत्महत्येच्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही महिला पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी उल्हास नदीवरील जुन्या पुलावर आली होती. पण त्याचवेळी अचानक तिने नदीत उडी मारली. या महिलेचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापुरात उल्हास नदीत उडी मारून एका महिलेनं आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या महिलेने पाण्याच्या प्रवाहात उडी मारतानाचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पाण्याच्या प्रवाहासोबत ही महिला वाहून गेली. या महिलेचा मृत्यू झाला असून तिचा शोध घेतला जात आहे. या महिलेने आत्महत्या केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
मुसळधार पावसामुळे उल्हास नदी दुधडी भरून वाहत असल्यामुळे या महिलेचा शोध घेण्यात अडचणी येत आहेत. ही महिला नेमकी कोण होती? कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. सध्या बदलापूर पोलिस या महिलेचा शोध घेत आहेत. मृतदेह शोधण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्या महिलेची ओळख पटवणे हे बदलापूर पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.