Local Train Update : मुसळधार पावसामुळे लोकलसेवा विस्कळी, पश्चिम रेल्वे १ तास उशिराने; मध्य आणि हार्बर मार्गावर काय परिस्थिती?

Mumbai Local Train Today Update News : मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा दीड तास उशिराने धावत असून मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्याही उशिराने सुरू आहेत.
mumbai local trains delayed due to heavy rain
mumbai local trains delayed due to heavy rain Saam Tv
Published On
Summary
  • पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा सध्या १ ते दीड तास उशिराने

  • मध्य रेल्वेवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने

  • हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने

  • पालघर, रायगड, नाशिक घाटमाथा आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी

  • मुंबई, ठाणे, पालघर, रायगड भागांतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून, खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, रेल्वे वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.आज पश्चिम रेल्वेवरील गाड्या १ ते दीड तास उशिराने धावत असून मध्य रेल्वे आणि हार्बर लाईनवर गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

पश्चिम रेल्वे १ तास उशिराने

पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा सध्या १ ते दीड तास उशिराने धावत आहे. काल दिवसभर वसई रोड आणि विरार दरम्यान मुसळधार पावसामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. ट्रॅकवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. आज सकाळपासून ही सेवा काही प्रमाणात पूर्ववत करण्यात आली असली, तरी वसई आणि विरार दरम्यान अजूनही काही ठिकाणी पाणी साचलेले आहे.

mumbai local trains delayed due to heavy rain
Health Care : जेवल्या जेवल्या लगेच प्रचंड झोप येतेय? तुमच्या ताटातच दडलंय 'हे' मोठं कारण

मध्य आणि हार्बर मार्गावर काय परिस्थिती?

डहाणू ते चर्चगेट लोकल सेवा मुंबईच्या दिशेने सुरू झाली असली तरी उशिरामुळे प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांची विरार रेल्वे स्थानकात प्रचंड गर्दी झाली असून हजारो प्रवासी स्थानकावर ताटकळत उभे आहेत. मध्य रेल्वेवरील लोकल सेवा देखील १५ ते २० मिनिटे उशिराने सुरू आहे. हार्बर मार्गावरील गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने धावत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

mumbai local trains delayed due to heavy rain
Monsoon Tips : पावसाळ्यात घरात पालींचा वावर वाढला? 'हे' उपाय वेळीच करा नाही तर...

हवामान विभागाचा अंदाज काय?

दरम्यान, हवामान विभागाने नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तर मुंबई, ठाणे, रत्नागिरी, नाशिक, सातारा घाटमाथा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासांत अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पावसाचा वाढता जोर आणि संभाव्यस्थिती लक्षात घेता मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नाशिक तसेच पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना आवश्यक तेव्हाच घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com