Alisha Khedekar
जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढून नंतर कमी झाल्यास थकवा, सुस्ती आणि झोप येण्याची शक्यता वाढते.
भात, पोळी, गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यास इन्सुलिन वाढून झोप येते.
दूध, दही, अंडी यांसारख्या पदार्थांतील ट्रिप्टोफॅन मेंदूत झोपेशी संबंधित रसायनांचे उत्पादन वाढवू शकतो.
जेवणानंतर रक्तप्रवाह पचनसंस्थेकडे वळतो, त्यामुळे काहींना सुस्ती आणि थकवा जाणवू शकतो.
रात्री पुरेशी झोप न झाल्यास जेवणानंतर शरीर विश्रांतीची मागणी करत असल्याने झोप अधिक येते.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यास थकवा वाढतो आणि जेवणानंतर झोप येण्याची शक्यता अधिक असते.
अवेळी जेवण केल्यास शरीराच्या ऊर्जेच्या पातळीत बदल होऊन सुस्ती जाणवते.
जेवणानंतर काही हार्मोन्स सक्रिय होतात, ज्यामुळे शरीराला आरामाची गरज भासू शकते आणि झोप येऊ शकते.