Shocking : संतापजनक! भररस्त्यात महिला कॉन्स्टेबल समोरच अश्लील हावभाव, तरुणाने प्रायव्हेट पार्ट दाखवला अन्...

West Bengal Crime News : पश्चिम बंगालच्या खरदाह येथे बसस्टॉपवर महिला कॉन्स्टेबलसोबत अश्लील वर्तन केल्याचा आरोप असलेल्या तरुणाला महिलेने स्वतः पकडून पोलीस ठाण्यात नेले. आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
WOMAN CONSTABLE DRAGS ACCUSED TO POLICE STATION AFTER OBSCENE ACT AT KHARDAH BUS STOP
WOMAN CONSTABLE DRAGS ACCUSED TO POLICE STATION AFTER OBSCENE ACT AT KHARDAH BUS STOPSaam Tv
Published On
Summary
  • पश्चिम बंगालच्या खरदाह येथे बसस्टॉपवर धक्कादायक घटना घडली

  • एका तरुणाने महिलेसमोर कथितरित्या अश्लील हावभाव आणि गैरवर्तन केले

  • संबंधित महिला ही पोलीस कॉन्स्टेबल

  • महिलेने आरोपीला पकडून थेट पोलीस ठाण्यात नेले

पश्चिम बंगालमध्ये खरदाह येथे एक धक्कादायक प्रकार घडला. नेहमीच वर्दळ असणाऱ्या बीटी रोडच्या एका बस स्टॉपवर एक तरुण उभा होता. काही वेळानंतर त्या बस स्टॉप समोरच एका महिलेने आपली दुचाकी थांबवली आणि कोणाची तरी वाट पाहू लागली. मात्र थोड्याचवेळात संबंधित तरुणाने महिलेसोबत जे केलं त्या कृत्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना एखाद्या थरारक चित्रपटातील सिनप्रमाणे अचानक घडली. आश्चर्यकारक म्हणजे ही महिला दुसरी तिसरी कोणीही नाही तर एका जवळच्या पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल होती. नेमकी काय घटना घडली? जाणून घ्या.

भर रस्त्यात काय घडलं?

बीटी रोडच्या एका बस स्टॉपवर एक तरुण उभा होता. या दरम्यान महिलेने बस स्टॉप समोरच आपली स्कुटी लावली. काही वेळाने संबंधित तरुणाने महिलेकडे बघून अश्लील हावभाव केले. महिलेने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र तो तरुण एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेला प्रायव्हेट पार्ट दाखवला.

WOMAN CONSTABLE DRAGS ACCUSED TO POLICE STATION AFTER OBSCENE ACT AT KHARDAH BUS STOP
Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

महिलेने तरुणाला ४०० किमी खेचत नेलं

या नंतर महिलेची सटकली. तिला राग अनावर झाला. तिने तरुणाची कॉलर पकडून तब्बल ४०० किमी खेचत पोलीस ठाण्यात नेले. सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांना वाटलं की किरकोळ भांडण झालं असेल. मात्र काही क्षणात महिलेचा चढलेला आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी जमा झाले. घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी तरुणाला चांगलाच चोप दिला.

WOMAN CONSTABLE DRAGS ACCUSED TO POLICE STATION AFTER OBSCENE ACT AT KHARDAH BUS STOP
Health Care : पावसाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी होते का? वेळेत जाणून घ्या नाहीतर...

तरुण निघाला डिलिव्हरी एजंट

पोलीस ठाण्यात गेल्यानंतर संबंधित महिला ही त्या पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल असल्याचे समोर आले. आरोपी तरुणाचे नाव आकाश घोष असून तो एका कंपनीत डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत असल्याचे उघडकीस आले आहे. सध्या, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपांची चौकशी झाल्यानंतर या प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com