Alisha Khedekar
पावसाळ्यात केळी खाल्ल्याने सर्दी होत नाही, पण काहींना कफ वाढल्यासारखे वाटू शकते.
सर्दी प्रामुख्याने व्हायरसमुळे होते. केळी खाणे हे सर्दी होण्याचे थेट कारण नाही.
ज्यांची प्रतिकारशक्ती कमी असते, त्यांना थंड पदार्थांमुळे त्रास अधिक जाणवू शकतो.
रात्री उशिरा केळी खाल्ल्यास काही लोकांना घसा जड किंवा कफ वाढल्यासारखे वाटते.
पूर्ण पिकलेली केळी पचनासाठी चांगली असतात आणि शरीराला आवश्यक ऊर्जा देतात.
काहींना केळीची अॅलर्जी असू शकते. अशावेळी शिंक किंवा घशाचा त्रास वाढू शकतो.
तज्ज्ञांच्या मते, पावसाळ्यात केळी खाणे सुरक्षित आहे. योग्य प्रमाण आणि वेळ महत्त्वाची आहे.
हे केवळ माहितीसाठी आहे, साम टीव्ही असा कुठलाही दावा करत नाही. डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्यावा.