51 कर्मचारी-अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई! प्रशासकीय वर्तुळात खळबळ; महापालिकेत नेमकं काय घडलं?

Solapur Municipal Corporation Action On Delayed Complaints: सोलापूर महापालिकेची मोठी कारवाई! ऑनलाईन तक्रारी व अर्ज वेळेत निकाली न काढल्याने ५१ अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई. ‘माय सोलापूर’ अॅप आणि लोकसेवा हक्क अधिनियमातील उल्लंघनामुळे प्रशासनात खळबळ.
Solapur Municipal Corporation takes strict action against 51 officials for failing to resolve citizen complaints on time.
Solapur Municipal Corporation takes strict action against 51 officials for failing to resolve citizen complaints on time.saam tv
Published On

विश्वभूषण लिमये, साम टीव्ही

नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी आणि अर्जांचे निवारण वेळेत न करता ते प्रलंबित ठेवणे सोलापूर महानगरपालिकेच्या ५१ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना चांगलेच महागात पडले आहे. महापालिका उपायुक्त सोनाली यादव यांनी कर्तव्यलवचिकतेचा दाखला देत या सर्वांवर थेट दंडात्मक कारवाईचे आदेश जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

'माय सोलापूर' अॅपवरील हलगर्जीपणा

महापालिकेच्या 'माय सोलापूर' (My Solapur) या मोबाईल अॅपवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारी वेळेत न सोडवल्याबद्दल २१ कर्मचाऱ्यांना एकूण ४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

लोकसेवा हक्क अधिनियमाचे उल्लंघन

नागरिकांनी लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत केलेले अर्ज वेळेत निकाली न काढता ते प्रलंबित ठेवल्याप्रकरणी २३ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तब्बल २५ हजार ९०० रुपयांचा सामूहिक दंड करण्यात आला आहे.

Solapur Municipal Corporation takes strict action against 51 officials for failing to resolve citizen complaints on time.
शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही

महापालिका प्रशासनाने डिजिटल प्रणालीचा वापर करून नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटाव्यात यासाठी ऑनलाईन सुविधा सुरू केल्या आहेत. मात्र, तरीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून कामात दिरंगाई होत असल्याचे समोर आले होते. या पार्श्वभूमीवर उपायुक्त सोनाली यादव यांनी ही कडक भूमिका घेतली आहे.

Solapur Municipal Corporation takes strict action against 51 officials for failing to resolve citizen complaints on time.
Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

महापालिकेचा कडक इशारा

नागरिकांच्या ऑनलाईन तक्रारी आणि अर्ज विहित मुदतीतच निकाली निघाले पाहिजेत. यामध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अशा कडक सूचना महापालिका प्रशासनाकडून सर्व संबंधित विभागांना आणि अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे आतातरी महापालिकेचा कारभार गतिमान होणार का आणि नागरिकांच्या तक्रारी वेळेत सुटणार का, याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com