शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

Supriya Sule Statement On NDA Alliance: राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये जाणार का? या चर्चांवर सुप्रिया सुळे यांनी मोठं वक्तव्य करत सर्व अफवांना पूर्णविराम दिला. जयंत पाटील-फडणवीस भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Supriya Sule addresses media amid speculation over NCP joining NDA in Maharashtra politics.
Supriya Sule addresses media amid speculation over NCP joining NDA in Maharashtra politics.saam tv
Published On

शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा NDA सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच मंगळवारी रात्री माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली. यामुळे या चर्चांना अधिक जोर आला. या सगळ्यावरच आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद घेत या चर्चेवर भाष्य केले. सुप्रिया सुळे म्हणाल्या, गेल्या काही दिवसांपासून आमचा पक्ष सत्तेत सामील होणार असल्याच्या बातम्या येत आहे. मात्र, क्षाने अद्याप यावर कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाहीये.

तसेच जी काय भूमिका दाखवली जात आहे ती सुत्रांमार्फत दाखवली जात आहे. असे कुठल्याही प्रमुख नेत्याने यावर भाष्य केलेलं नाही. मी संजय राऊत, हर्षवर्धन सपकाळ आणि बंटी पाटील यांच्याशी फोनवर चर्चा करून सांगितले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (NDA) एनडीएसोबत जाण्याची चर्चा पक्षात नाही असे सांगत त्यांनी या सगळ्या चर्चांचे खंडन केले.

Supriya Sule addresses media amid speculation over NCP joining NDA in Maharashtra politics.
Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

डिलिमिटेशन बिला संदर्भात 24 तासांत मांडणार भूमिका

डिलिमिटेशन बिला संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महिला आरक्षणाचे बिल हे पास झाले असून त्याबाबत कुठलीही शंका नाहीये. मी तुम्हाला थोडंस इतिहासात नेते, किरीन रिजिजू यांनी ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, ओवेसी, आणि मला दिल्लीत बोलावले होते. या बैठकीत गृहमंत्री अमित शाह देखील होते. त्यांनी आम्हाला या विधेयका संदर्भात सगळी माहिती दिली.

Supriya Sule addresses media amid speculation over NCP joining NDA in Maharashtra politics.
Railway Rules : प्रवाशांनो रेल्वेचं तिकीट रद्द करण्यापूर्वी वाचा 'हे' नवे नियम, नाहीतर मिळणार नाही रिफंड

या विधेयकामुळे कोणावरही अन्याय होणार नाही काश्मीर ते कन्याकुमारी सगळीकडे एकच नियम लागू होईल अशी ग्वाही दिली. त्यामुळे त्यामध्ये सुधारणा होणार असून त्याचा प्रस्ताव आल्यावर आम्ही 24 तासांत अभ्यास करून आमची भूमिका मांडू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com