Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला पावसाळ्यात जवळच आणि सुंदर ठिकाणी फिरायला जायचं असेल तर महाराष्ट्रातल्या मिनी काश्मीरला नक्कीच भेट द्या.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं तापोळा हे महाराष्ट्रातलं सर्वात निसर्गरम्य पर्यटनस्थळांपैकी एक मानलं जातं. हे महाबळेश्वरमध्ये आहे.
तापोळा हे सातारा जिल्ह्यामधल्या महाबळेश्वरजवळ आहे. कोयना बॅकवॉटरमुळे हे ठिकाण पर्यटकांचं आकर्षण ठरतं.
राज्यातल्या कोणत्याही भागातून ट्रेन किंवा बसने आधी सातारा किंवा महाबळेश्वरजवळ पोहोचा.
महाबळेश्वरहून तापोळ्याला जाण्यासाठी एसटी बस, शेअर जीप किंवा प्रायव्हेट वाहनांची सुविधा उपलब्ध तुम्हाला मिळेल.
डोंगर, धुकं, हिरवाई आणि जलाशयाचं सुंदर मिश्रण तापोळ्यात तुम्हाला अनुभवायला मिळते.
तापोळ्यात विविध अॅग्रो टुरिझम आणि कॅम्पिंगचे ऑप्शन्स आहेत. तिथे निसर्गाच्या सान्निध्यात मुक्काम करता येतो.
काही ठिकाणी 1,500 रुपयांमध्ये राहण्याची व्यवस्था, चहा, नाश्ता आणि गावरान जेवणाची सुविधा दिली जाते.
शिवसागर लेकमध्ये स्पीड बोट राइड आणि इतर अॅक्टीव्हीचा आनंद तुम्हाला घेता येतो.