भारतीय रेल्वेने तिकीट रद्दीकरण आणि रिफंड नियमांमध्ये बदल
ट्रेन सुटण्यास ७२ तासांपेक्षा जास्त वेळ असल्यास पूर्ण रिफंड मिळेल
२४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास केवळ ५०% रिफंड मिळणार
ट्रेन सुटण्यास ८ तासांपेक्षा कमी वेळ असल्यास कोणताही रिफंड मिळणार नाही
प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या माहितीनुसार, आता तिकीट रद्द केल्यास 'रिफंड' ट्रेन सुटण्याच्या काही तास आधी देण्यात येणार आहे. त्यामुळे ट्रेनचं तिकीट रद्द करणार असाल तर हा महत्त्वाचा निर्णय माहित असणं गरजेचं आहे. जाणून घ्या याबाबद्दल सविस्तर माहिती.
नव्या नियमानुसार तुम्ही देखील रेल्वेने प्रवास करण्याच्या काही तास आधी तिकीट रद्द केलं तर, तुम्हाला येणारा रिफंड आता ट्रेनच्या वेळेवर अवलंबून असणार आहे. उदाहरणार्थ कोकणात जाणाऱ्या एका कुटुंबाने ट्रेन सुटण्याच्या ट्रेन सुटण्यापूर्वी २४ ते ८ तासांच्या दरम्यान तिकीट रद्द केल्यास त्यांना इथून पुढे फक्त ५० टक्के रिफंड मिळणार आहे.
ट्रेन सुटण्यापूर्वी ७२ तासांहून अधिक वेळ असल्यास तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळेल, मात्र, ७२ ते २४ तासांच्या कालावधीत तिकीट रद्द केल्यास भाड्याच्या २५ टक्के रक्कम रिफंड म्हणून वजा केली जाईल.तसेच ट्रेन सुटण्यासाठी ८ तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास कोणताही रिफंड आता मिळणार नाही.
प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाचा दिलासा म्हणजे काउंटरवरून घेतलेले तिकीट आता देशातील कोणत्याही रेल्वे तिकीट काउंटरवरून रद्द करता येणार आहे. यापूर्वी तिकीट ज्या ठिकाणाहून बुक केले होते, त्याच ठिकाणी जाऊन ते रद्द करावे लागत होते. दरम्यान आता प्रवासी ट्रेन सुटण्याच्या ३० मिनिटांपूर्वीपर्यंत आपले बोर्डिंग स्टेशन देखील बदलू शकणार आहेत. पूर्वी ही सुविधा आरक्षण चार्ट तयार होण्यापूर्वीच उपलब्ध होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.