

अहिल्यानगरच्या कानिफनाथ मंदिर परिसरात धक्कादायक घटना घडल्याचा दावा.
मंदिरातील बाथरूममध्ये साधू आणि महिला नग्न अवस्थेत आढळल्याची माहिती.
घटनेनंतर गावकरी आणि भाविकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण.
पोलिसांत अद्याप गुन्हा दाखल नसल्याने चौकशी व कारवाईची मागणी.
देवस्थान ट्रस्टींच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित.
अहिल्यानगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. देवस्थानातील बाथरूममध्ये एका साधूने भयंकर कृत्य केले. बाथरूममध्ये एका महिलेसोबत हा साधू नग्न अवस्थेत आढळून आला. ही घटना उघड होताच एकच खळबळ उडाली. या साधूविरोधात अद्याप कोणतिही कारवाई करण्यात आली नाही. तसंच पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला नाही त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी येथे ही घटना घडली. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री चैतन्य कानिफनाथ मंदिर देवस्थानमध्ये हा प्रकार घडला. देवस्थानाच्या बाथरूममध्ये एका तथाकथित साधूला नग्न अवस्थेत महिलेसोबत पकडण्यात आले. या घटनेमुळे मढी गावात एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडिओ मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी समाज माध्यमांना दिला.
हा साधू आणि ती महिला एकत्र गेले होते की त्या महिलेला त्याने बळजबरी बाथरूममध्ये नेले होते? याबाबत अद्याप कोणतीही माहिती हाती आलेली नाही. या प्रकरणी पोलिस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. मात्र देवस्थानच्या परिसरामध्ये हा प्रकार घडल्यामुळे भाविकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. मढी गावचे सरपंच संजय मरकड यांनी याबाबत देवस्थानच्या ट्रस्टींना दोषी ठरवत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
एवढी मोठी घटना देवस्थानच्या परिसरात घडूनही देवस्थानचे ट्रस्टी तोंडाला पट्टी लावून बसले आहेत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होऊन ट्रस्टींसह साधूवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच संजय मरकड यांनी केली आहे. या घटनेनंतर गावकरी आक्रमक झाले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.