MHADA Lottery : ठाणे, कल्याणमध्ये फक्त २० लाखांत घर, दिवाळीआधी म्हाडाची १००० घरांची लॉटरी निघणार

MHADA Konkan Lottery Update News : मुंबई आणि परिसरातील घरखरेदीदारांसाठी दिलासा! म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे १००० घरांची लॉटरी; २० ते २५ लाखांच्या घरांची शक्यता आणि दसऱ्याआधी जाहिरात प्रसिद्ध होण्याचे नियोजन.
Mumbai MHADA Lottery
Mumbai MHADA LotteryAI Image
Published On
Summary
  • म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे १००० घरांची लॉटरी

  • घरांची किंमत अंदाजे २० ते २५ लाख रुपये असण्याची शक्यता

  • ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार परिसरातील घरांचा समावेश

  • लॉटरीची जाहिरात दसऱ्याआधी प्रसिद्ध होण्याची शक्यता

मुंबई आणि परिसरात स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सर्वसामान्यांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून सुमारे १००० घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, या घरांची जाहिरात दसऱ्याआधी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या लॉटरीची सोडत दिवाळीआधी काढण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील घरांच्या वाढत्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे मुंबईलगतच्या ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार परिसरात परवडणाऱ्या घरांच्या शोधात असलेल्या नागरिकांचे लक्ष दरवर्षी म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीकडे असते. यंदाही हजारो अर्जदार या लॉटरीची प्रतीक्षा करत आहेत.

Mumbai MHADA Lottery
Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

२० ते २५ लाख रुपयांत घर

कोकण मंडळाच्या आगामी लॉटरीमध्ये ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार महापालिका क्षेत्रातील विखुरलेल्या घरांचा समावेश असणार आहे. ही घरे प्रामुख्याने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. या घरांची किंमत साधारणपणे २० ते २५ लाख रुपयांच्या दरम्यान असण्याची माहिती आहे. त्यामुळे कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांना मुंबई महानगर प्रदेशात स्वतःचे घर घेण्याची संधी मिळू शकते.

Mumbai MHADA Lottery
Kitchen Hacks : पितळ आणि तांब्याच्या भांड्यांचा काळपटपणा जात नाहीये? 'या' ट्रिक्स वापरून होतील लख्ख

घरांची संख्या कमी होण्यामागे काय कारण?

म्हाडाला खासगी विकासकांकडून मिळणाऱ्या २० टक्के घरांच्या वितरणाबाबत सरकारने नुकताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ही घरे म्हाडामार्फत थेट वितरित करण्याऐवजी संबंधित महापालिकांच्या माध्यमातून वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी उपलब्ध होणाऱ्या घरांची संख्या तुलनेने कमी झाली आहे. तरीही उपलब्ध असलेल्या सुमारे १००० घरांची लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू असून, दसऱ्याआधी जाहिरात प्रसिद्ध करण्याचे नियोजन आहे. “कोकण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या सुमारे एक हजार घरांच्या लॉटरीची जाहिरात दसऱ्याआधी जाहीर केली जाणार असून, त्याची कार्यवाही सुरू आहे,” अशी माहिती कोकण मंडळाचे मुख्य अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी दिली. आता जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया, पात्रता, उत्पन्न गट, घरांची ठिकाणे आणि अंतिम किंमतीबाबत अधिकृत माहिती स्पष्ट होणार आहे. त्यामुळे इच्छुक अर्जदारांनी म्हाडाच्या अधिकृत घोषणेकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com