Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

Mumbai Dr Hemraj Shah Dies News : ठाकरेसेनेचे नेते आणि महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन झाले.
Dr. Hemraj Shah Passes Away At 84
Dr. Hemraj Shah Passes Away At 84Saam Tv
Published On
Summary
  • ठाकरेसेनेचे नेते डॉ. हेमराज शाह यांचे वयाच्या ८४व्या वर्षी निधन

  • मुंबईत घेतला अखेरचा श्वास

  • महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे त्यांनी तब्बल ३५ वर्षे अध्यक्षपद सांभाळले

राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरेसेनेचे नेते तसेच महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाचे अध्यक्ष डॉ. हेमराज शाह यांनी वयाच्या ८४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात अरविंद शाह आणि उदय शाह ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान त्यांच्या जाण्याने कुटुंबासह राजकीय क्षेत्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समाजकारण, पत्रकारिता, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात दीर्घकाळ निःस्वार्थपणे कार्य करणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. शाह यांची ओळख होती. मुंबईसह महाराष्ट्रातील गुजराती समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. बृहन्मुंबई गुजराती समाजाच्या माध्यमातून त्यांनी तब्बल १३९ गुजराती संस्थांचे फेडरेशन उभारले. या संस्थांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सक्रिय भूमिका बजावली. ‘कच्छ-शक्ती’ या वार्षिकाचे संपादक म्हणून त्यांनी कच्छी आणि गुजराती समाजातील सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना व्यासपीठ मिळवून दिले. गुजराती भाषा, साहित्य आणि राजकारण या विषयांवर त्यांनी लेखन केले. त्यांनी गुजराती भाषेत १९, मराठीत ८ आणि इंग्रजीत २ पुस्तकांचे अनुवाद केले, तर गुजरातीतील ३२ आणि मराठीतील ४ पुस्तके संपादित केली.

Dr. Hemraj Shah Passes Away At 84
Rain Update : वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस, २१ राज्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज काय?

महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळाच्या स्थापनेपासून तब्बल ३५ वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. जोगेश्वरी (पश्चिम) येथे त्यांच्या पुढाकारातून सात मजली नवनीत गुजराती समाज भवनाची उभारणी झाली. या भवनात त्यांच्या कार्याची आठवण जपणारे डॉ. हेमराज शाह स्मृती संग्रहालयही स्थापन करण्यात आले आहे. तसेच शिर्डीच्या साईबाबा संस्थानाचे विश्वस्त आणि महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. विश्व गुजराती समाज, द बुक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कच्छ-शक्ती, उमरगाव गोशाळा आणि श्री वागड वीसा ओसवाल विकास समाज अशा विविध संस्थांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Dr. Hemraj Shah Passes Away At 84
Breaking News : सरकारचा मोठा निर्णय! डॉक्टरांच्या निवृत्तीचे वय ६५ वरून ७० वर्षांपर्यंत वाढवले; जाणून घ्या सविस्तर माहिती

महाराष्ट्रातील इतर मागासवर्गीय प्रवर्गात दहा विविध जातींचा समावेश करण्यासाठीही त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. स्तंभलेखक आणि संपादक म्हणून त्यांनी पत्रकारितेतही आपला ठसा उमटवला. सामाजिक आणि साहित्यिक क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील गुजराती समाजासह सामाजिक, राजकीय,साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com