

CJPच्या २ ऑक्टोबरच्या शिवाजी पार्क आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली.
न्यायालयीन आदेशांमुळे शिवाजी पार्कवरील सार्वजनिक सभांना परवानगी देण्याचा अधिकार पोलिसांकडे नाही.
आयोजकांना मुंबईतील दुसऱ्या ठिकाणी आंदोलनासाठी परवानगी मागण्याचा सल्ला देण्यात आला.
अभिजीत दिपके याच्या नेतृत्वाखालील कॉक्रोच जनता पक्षाला मोठा झटका बसला आहे. निवडणूक आयोगाच्या विरोधात सीजेपीने आंदोलनाचा एल्गार पुकारला होता. हे आंदोलन २ ऑक्टोबर रोजी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानात करण्यात येणार होते, त्यासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागितली होती. परंतु शिवाजी पार्कवरील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारलीय.
शिवाजी पार्कऐवजी मुंबईतील दुसऱ्या मैदानावर आंदोलनाच्या परवानगीसाठी अर्ज करा, अशी सूचना पोलिसांनी सीजेपीला करण्यात आलीय. मिळालेल्या माहितीनुसार, आयोजकांनी २ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ ते ५ या वेळेत शिवाजी पार्क मैदानावर शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. मात्र, शिवाजी पार्क पोलीस ठाण्याने विविध कायदेशीर आणि सुरक्षेच्या कारणास्तव ही परवानगी फेटाळून लावली.
आंदोलनाला परवानगी नाकारताना पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या एका महत्त्वपूर्ण आदेशाचा हवाला दिलाय. शिवाजी पार्क हे क्रीडांगण असल्याने त्याचा वापर खेळाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी किंवा राजकीय, सामाजिक सभा आंदोलनांसाठी करण्यावर मुंबई उच्च न्यायालयाने कडक निर्बंध लादलेत. न्यायालयाच्या याच नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलंय.
न्यायालयीन आदेशाव्यतिरिक्त पोलिसांनी सुरक्षेचा प्रश्न पुढे केला. दादरसारख्या गजबजलेल्या भागात आंदोलन झाल्यास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होऊ शकते. ऐन सणासुदीच्या आणि सुट्टीच्या दिवशी ध्वनी प्रदूषणाचा धोका निर्माण होऊन स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागू शकतो, अशी कारणे मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारताना दिली आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.