CJP संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा मैदानात; मुंबई पोलिसांना आंदोलनासाठी पत्र|VIDEO

CJP Founder Abhijeet Dipke Protest Against Election Commission in Mumbai: CJP संस्थापक अभिजीत दीपके पुन्हा मैदानात उतरले असून, निवडणूक आयोगाच्या विरोधात मुंबईतील शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली आहे.

मुंबईत निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्यासाठी CJP कॉकरोच जनता पार्टीकडून शिवाजी पार्क पोलिसांना पत्र देण्यात आले आहे. या आंदोलनासाठी पोलिसांकडे अधिकृत परवानगी मागण्यात आली आहे. शुक्रवारी दुपारी 3 ते रात्री 9 वाजेपर्यंत शिवाजी पार्क येथे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन करण्याची परवानगी CJPने मागितली आहे. निवडणूक प्रक्रियेसंदर्भातील विविध मुद्द्यांवरून हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे पत्रातून नमूद करण्यात आले आहे. आता शिवाजी पार्क पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी मिळते का, याकडे लक्ष लागले आहे. निवडणूक आयोगतील वाद चव्हाट्यावर आल्याने देशातील विरोधीपक्ष हे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मैदानात उतरत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com