त्यापेक्षा वादमुक्त कसा होईल...; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय कृती समितीचे पुणे पोलिसांना पत्र

Pune Ganesh Mandals Letter To Police Over DJ And Sound System Rules: पुण्यात गणेशोत्सव डीजेमुक्त किंवा डीजेयुक्त होण्यापेक्षा वादमुक्त व्हावा, अशी गणेश मंडळांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
Pune Ganesh mandals letter to police over DJ and sound system rules
Pune Ganesh mandals letter to police over DJ and sound system rulessaam tv
Published On

पुण्यात गणेशोत्सव डीजेमुक्त किंवा डीजेयुक्त होण्यापेक्षा वादमुक्त व्हावा, यासाठी गणेश मंडळांनी पुढाकार घेतला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय कृती समितीच्या वतीने पुणे पोलिसांना पत्र देण्यात आले असून, गणेशोत्सवादरम्यान ध्वनिप्रदूषण, मिरवणुका आणि कार्यकर्त्यांच्या वर्तनाबाबत विविध मुद्द्यांवर मंडळांमध्ये एकमत झाल्याचे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Ganesh mandals letter to police over DJ and sound system rules
आवाज कमी करा, मोठा करा पण एकदा काय ते ठरवा! पुणे महापालिकेतील गणेश मंडळाच्या बैठकीत काय घडलं?

प्लाझ्मा साऊंड तसेच प्रेशर मीडवर शहरी भागात संपूर्ण बंदी घालावी, तसेच प्लाझ्मा साऊंडचा वापर करणार नाही, अशी गणेश मंडळांकडून लेखी हमी घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र चांगल्या दर्जाचे आणि नागरिकांना त्रास न होणारे ब्रँडेड स्पीकर्स निर्बंधमुक्त ठेवावेत, अशी सर्व गणेश मंडळांची आग्रही मागणी आहे. गणेश मंडळांनी स्पीकर्सच्या भिंती उभारू नयेत आणि लेझर लाईटवरही बंदी घालण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. तसेच मिरवणुकीतील वाहनांवर लाईट लावण्यासाठी उभारण्यात येणारे स्टँड मजबूत आणि सुरक्षित पद्धतीने उभारण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune Ganesh mandals letter to police over DJ and sound system rules
Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला

दरम्यान, लहान मुले आणि मुली साऊंडवर उभे राहून नाचणे तसेच गणेश मंडळांचे कार्यकर्ते विचित्र हावभाव करत नाचणे, याकडे मंडळांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी जातीने लक्ष द्यावे आणि अशा प्रकारांवर निर्बंध घालावेत, अशी स्पष्ट सूचना बैठकीत करण्यात आली आहे. सर्व गणेश मंडळे आणि स्पीकर मालकांनी साऊंडची स्पर्धा टाळावी, तसेच मिरवणूक, गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या काळात पोलिस आणि नागरिकांना सहकार्य करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच पोलीस आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पुन्हा एकदा पोलीस ठाण्यांच्या हद्दीनुसार संयुक्त बैठका घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. या बैठकांमधून दोन्ही बाजूंमधील विश्वास वाढवण्यावर भर देण्याची भूमिका मंडळांनी मांडली आहे.

Pune Ganesh mandals letter to police over DJ and sound system rules
Pune News: विजेचा धक्का लागून २ भावांचा मृत्यू, आईच्या डोळ्यासमोर मुलांनी सोडले प्राण

सण-उत्सवांसाठी भविष्यात तयार करण्यात येणारी नियमावलीही कार्यकर्ते आणि उत्सव आयोजकांना विश्वासात घेऊन तयार करावी आणि ही नियमावली १ जानेवारी २०२७ पासून लागू करण्यात यावी अशी मागणी सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय कृती समितीने केली आहे.

मंडळांच्या प्रमुख मागण्या

प्लाझ्मा साऊंड आणि प्रेशर मीडवर शहरी भागात बंदी

प्लाझ्मा साऊंड न वापरण्याची लेखी हमी

नागरिकांना त्रास न देणारे चांगल्या दर्जाचे स्पीकर्स निर्बंधमुक्त ठेवावेत

स्पीकर्सच्या भिंती उभारू नयेत

लेझर लाईटवर बंदी

मिरवणुकीतील लाईटचे स्टँड सुरक्षित आणि मजबूत असावेत

अश्लील/विचित्र हावभाव करत नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर मंडळांनी निर्बंध घालावेत

साऊंडची स्पर्धा टाळावी

उत्सव काळात पोलीस आणि नागरिकांना सहकार्य करावे

पोलीस व मंडळांमध्ये पुन्हा संयुक्त बैठका घ्याव्यात

नवीन उत्सव नियमावली १ जानेवारी २०२७ पासून लागू करावी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com