

पुण्यात विजेचा धक्का लागून दोन भावांचा मृत्यू
दौंड तालुक्यातील राहूमध्ये ही घटना घडली
कपडे वाळत घालण्याच्या लोखंडी तारेत वीज उतरल्याने घडली घटना
आईच्या डोळ्यासमोर दोन मुलांनी सोडले प्राण
विजेचा धक्का लागून दोन भावांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील राहूमध्ये ही घटना घडली. सोनवणे मळा परिसरात कपडे वाळत घालण्याच्या तारेत अचानक वीजप्रवाह उतरल्याने २ तरुण भावांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाली. रोहित अनिल भोईटे आणि ओम नितीन भोईटे अशी मृत्यू झालेल्या दोन तरुणांची नावं आहेत. या २ चुलत भावांच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
आज सकाळी गोठ्याबाहेर कपडे वाळत घालताना अचानक लोखंडी तारेत वीज उतरल्याने ही घटना घडली. दोन्ही भावांचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन वीजपुरवठा खंडित केला मात्र तोपर्यंत मोठा अनर्थ घडला होता. रोहित आणि ओम यांनी आईच्या डोळ्यासमोर प्राण सोडले. या घटनेत जखमी झालेल्या महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण राहू परिसरावर शोककळा पसरली असून यवत पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये भीषण अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. नाशिकच्या मालेगाव- चाळीसगाव रोडवरील दहिवाळ गावाजवळ ही घटना घडली. एसटी आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही महिला एसटी बसमधून प्रवास करत होत्या. या अपघातामध्ये एसटी बसमधील २५ प्रवासी जखमी झाले. एसटी बस आणि टेम्पोची समोरासोर धडक होऊन ही घटना घडली. या अपघाताचा तपास पोलिस सध्या करत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.