Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

Pune Vetal Tekdi Crime News : पुण्यातील वेताळ टेकडीवर एका तरुणाची हातोडीने वार करत हत्या करण्यात आली. ‘विरोधी पार्टीचे स्टेटस’ ठेवल्याच्या रागातून अल्पवयीन मित्रांनीच मित्राचा घात केला. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.
Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात
Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घातmeta ai
Published On

अक्षय बडवे

पुण्यातील वेताळ टेकडीवर मध्यरात्री एक रक्तरंजीत थरार रंगला. जीवाभावाच्या मित्रांनीच एका शुल्लक कारणावरून आपल्या मित्रावर हातोडीने हल्ला करत त्याचा जीव घेतला. विरोधी पक्षाचे स्टेटस ठेवले म्हणून मित्रांनीच काटा काढला. मयत तरुणाच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या हत्येप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन तरुणांना ताब्यात घेतले आहे.

काही दिवसांपूर्वीच तीन जीवलग मित्र कोथरूडमध्ये श्रावणधारा सोसायटीच्या परिसरात राहण्यास आले होते. तिन्ही तरूण अल्पवयीन होते. यातील मयत हा बारावीमध्ये शिक्षण घेत होता तर ताब्यात घेतलेला एक आरोपी हा बारावीचे शिक्षण घेत होता. दुसरा आरोपी कामाला नव्हता. पण या जीवलग मैत्रीचे रूपांतर रक्तांच्या थारोळ्यात होईल याचा कोणी विचारही केला नव्हता.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात
जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढळले मृतदेह अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी या आरोपींपैकी एकाचे त्याच्या विरोधकांशी कशावरून तरी वाद झाले होते आणि त्यातून त्यांचे भांडण सुध्दा झाले. या भांडणांबद्दल या तिघांमध्ये सुद्धा चर्चा झाली होती. यातील मयत तरुण हा आरोपींच्या बाजूने मोबाईल वर "स्टेटस" ठेवत होता. अनेकवेळा यातील एका मित्राने तू "त्यांचा स्टेटस नको ठेवत जाऊ" असे समजावत होता. परंतु मयत तरूण त्यांचे बोलणे धुडकावून लावत असे.

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात
Kerala Crime : "बॉयफ्रेंडला iPhone घ्यायचा होता..." १३ वर्षांच्या नातीने आजोबांना संपवलं; पोलीसही चक्रावले

याच गोष्टीचा राग मनात ठेऊन या दोघांनी त्यांच्याच मित्राचा काटा काढायचे ठरवले. यासाठी या दोघांनी त्याला राजगड येथे फिरायला जाण्यासाठी आग्रह केला. मंगळवारी हे तिघे ही राजगड येथे फिरून जाऊन आले. रात्री उशिरा परत पुण्यात पोहचवल्यावर हे दोघे त्याला घेऊन टेकडीवर गेले. तिथे त्यांनी मध्यरात्रीच्या वेळेचा आधार घेत निर्मनुष्य ठिकाणी जाऊन त्याच्या डोक्यात हातोडा घातला. हातोड्याचे वार झाल्यामुळे तरुण रक्ताच्या थारोळ्यात तिथेच पडला होता. मित्राला संपवल्यावर या दोघांनी तिथून पळ काढला. सकाळी टेकडीवर फिरायला गेलेल्या नागरिकांनी हा प्रकार पाहताच तात्काळ पोलिसांना कॉल केला. कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपींचा शोध घ्यायला सुरुवात केली. ट्रैकिंग,गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कोथरूड पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com