जात जिंकली, प्रेम हारलं! घरच्यांच्या विरोधाला कंटाळून तरुण-तरुणीचे टोकाचे पाऊल, तलावात आढलले मृतदेह अन्...

Washim Lover Couple Found Dead : वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोर्णा तलावात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले. दोघेही काही दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांचा विरोध असल्याची माहिती समोर आली असून, पोलीस तपास करत आहेत.
Washim couple found dead in Morna Lake
Washim couple found dead in Morna Lake
Published On
Summary
  • मोर्णा तलावात आढळला युवक-युवतीचा मृतदेह आढळले.

  • मासेमारीसाठी गेलेल्या वक्तींना आढळले मृतदेह

  • दोघेही १४ ऑगस्टपासून होते बेपत्ता.

मनोज जैस्वाल, साम प्रतिनिधी

प्रेम ना वय बघतं, ना पैसा, ना धर्म ना जात, बस ते बघतं ते फक्त मन. वाशिममधील २४ वर्षीय महादेव आणि २१ वर्षीय निकिताचंही तसेच होतं. पाण्याप्रमाणे निख्खळ प्रेम. त्या दोघांना लग्न करायचं होतं, सात जन्म सोबत राहायचं होतं. पण या दोघांची प्रेमाला यश मिळालं नाही. त्यांच्या घराच्यांना दोघांचं लग्न मान्य नव्हतं, त्याचं कारण, होतं दोघांची जात.

Washim couple found dead in Morna Lake
Kerala Crime : "बॉयफ्रेंडला iPhone घ्यायचा होता..." १३ वर्षांच्या नातीने आजोबांना संपवलं; पोलीसही चक्रावले

आपण आधुनिक जगात जगत असलो तरी लोकांच्या मनातील जात ही जात नाही. अजूनही खोट्या प्रतिष्ठेतेसाठी प्रेमविवाहला विरोध होतोय. घरच्यांचा विरोध होत असल्यानं महादेव आणि निकितानं टोकाचा निर्णय घेत वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील मोर्णा तलावात उडी घेत आपलं जीवन संपवलं. याबाबतची माहिती पोलिसांनी दिलीय.

Washim couple found dead in Morna Lake
Wardha Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधात अडथळा, महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं; वर्धा हादरले

मालेगाव तालुक्यातल्या गोकसावंगी गावातील 24 वर्षीय युवक महादेव गजानन आणि 21 वर्षीय निकीता संतोष हे दोघेही 14 ऑगस्टपासून बेपत्ता होते. याप्रकरणी त्यांच्या पालकांनी मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये (मिसिंगची) हरवल्याची तक्रारही दिली होती. मात्र काल या दोघांचेही मृतदेह गावाजवळच असलेल्या मोर्णा तलावात आढळून आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांचे प्रेमसंबंध होते. लग्न करण्यासंदर्भात त्यांनी घरच्यांना माहिती दिली होती.

मात्र दोघेही वेगवेगळ्या जातीतील असल्यानं त्यांच्या घरच्यांचा या आंतरजातीय विवाहाला विरोध होता. घरच्यांना अनेकवेळा समजून सांगूनही ते लग्नाला तयार होत नसल्यानं ते नैराश्यात गेले होते. या दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. ते दोघेही मोर्णा तलावाजवळ आले आणि तलावात उडी घेत जीवन संपवलं. बुधवारी मासेमारी करण्यासाठी काही जण गेले होते, तेव्हा त्यांना दोन्ही मृतदेह एकाच ठिकाणी आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मृतदेह तलावच्या बाहेर काढून पोस्ट मॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवले. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com