Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?

Lastest Pune News : दुबई-अबूधाबी येथे नोकरी करणारा तरुण दिल्लीला येत असताना पुणे विमानतळावर उतरला आणि अचानक गायब झाला. कुटु्ंबीयांनी पुणे पोलीसांकडे तक्रार दाखल केली असून पोलीस याप्रकरणात तपास करत आहेत.
Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?
Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?meta ai
Published On

सागर आव्हाड

दुबई - अबूधाबी येथे नोकरी करणारा तरूण दिल्लीत आपल्या घरी येत होता. 1 ऑगस्ट रोजी रात्री 11.15 वाजता तो दिल्लीला उतरणार होता.मात्र तो मधेच पुणे विमानतळावर उतरला आणि पुढे त्याचा ठावठिकाणा लागल नाही. याप्रकरणी तरूणाच्या भावाने पुणे विमानगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

बेपत्ता झाल्याची घटना घडली

दुबई-अबूधाबी येथे नोकरी करणारा तरुण दिल्लीला येत असताना पुणे विमानतळावर उतरून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने विमाननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून तरुणाचा शोध घेण्याची विनंती केली आहे.मो. फैसल (रा. मोहल्ला कोटरा, ता. शेरकोट, जि. बिजनौर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ मो. अफजल हा दुबई-अबूधाबी येथे नोकरीसाठी राहत होता. ३० जुलै २०२६ रोजी एअर इंडिया एक्स्प्रेसच्या IX-284 या विमानाने दिल्लीला येण्यासाठी त्याने बुकिंग केले होते. रात्री ११.१५ वाजता विमान दिल्लीला पोहोचणे अपेक्षित होते.

Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?
Toilet: बेडरूम- हॉल अन् किचन...! स्वच्छतागृह आहे की आलिशान घर; ४० लाखांचे टॉयलेट चर्चेत, VIDEO पाहून तुमचेही डोळे फिरतील

मात्र, अफजल दिल्लीला पोहोचला नसल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आले. त्याच्याबाबत माहिती घेतल्यानंतर तो पुणे विमानतळावर उतरल्याचे समोर आले. त्यानंतर पुणे विमानतळावरही त्याचा ठावठिकाणा लागला नाही. कुटुंबीयांनी नातेवाईकांकडे तसेच विविध ठिकाणी चौकशी केली; मात्र अफजबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.

Pune News : पुणे विमानतळावर तरूण अचानक बेपत्ता; १८ दिवसांपासून पोलिस घेतायत शोध, नेमकं झालं काय?
Pune Accident: नवले पुलाजवळ पुन्हा अपघाताचा थरार, ५ ते ६ वाहनं एकमेकांना धडकली; पुणे- बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी

अफजलचा मोबाइल क्रमांकही तक्रारीत नमूद करण्यात आला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तातडीने तपास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. २ ऑगस्ट २०२६ रोजी विमाननगर पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून बेपत्ता तरुणाचा शोध सुरू आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com