

पुण्यात नवले पुलाजवळ ५ ते ६ वाहनांचा भीषण अपघात
नवले पुलाजवळ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक
अपघातामध्ये रिक्षाचालक गंभीर जखमी
पुणे -बंगळुरू महामार्गावर अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी
पुण्यातील नवले पुलावजवळ भीषण अपघाताची घटना घडली. ५ ते ६ वाहनांचा विचित्र अपघात झाला. या सर्व वाहनांची एकमेकांना जोरदार धडक झाली. अपघातामध्ये वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघातामध्ये जिवीतहानी झाली नाही पण एक रिक्षाचालक गंभीर जखमी झाला. या अपघातामुळे पुणे- बंगळुरू महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील नवले पुलाजवळ आज दुपारच्या सुमारास ५ ते ६ वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. कात्रजकडून नवले पुलाच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून रिक्षाचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. नवले पूल परिसरात वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थापन आणि रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.