पुण्यात अपघाताचा थरार; नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा भीषण अपघात

pune accident news : पुण्यात पुन्हा भीषण अपघाताची घटना घडली आहे. नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा अपघात घडल्याने एकच खळबळ उडाली.
pune accident
pune newsSaam tv
Published On
Summary

पुण्यात अपघातांचं सत्र थांबेना

नवले पुलाजवळ दिवसभरात दुसरा अपघात

अपघातात एक जण किरकोळ जखमी

अक्षय बडवे, साम टीव्ही

पुण्यात अपघातांची मालिका सुरू आहे. पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात झाला आहे. पुलाजवळ दिवसभरात दुसरा अपघात घडला आहे. या अपघाताने पुलावर एकच खळबळ उडाली.

पुणेकरांची सकाळ आता अपघाताने होऊ लागली आहे. विशेष म्हणजे पुण्यातील नवले पुलाजवळ सकाळ वाहन अपघातानेच होत आहे. नवले पुलाजवळच्या ब्लॅक स्पॉटवर आज सोमवारी अपघात झाला. या अपघातात दोन जण जखमी झाले होते. त्यानंतर आता पुलाजवळ सायंकाळी पुन्हा एकदा अपघात झाला आहे.

pune accident
पुण्यातील राजकारण फिरणार; भाजपविरोधात लवकरच 'लेटर बॉम्ब', पत्रात नेमकं कुणाचं नाव?

नवले पुलाजवळ असलेल्या स्वामी नारायण मंदिर परिसरात अपघात झाला. या अपघातात चार चाकी वाहनाचे मोठे नुकसान झालं आहे. अपघातानंतर रस्त्यावर दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातात एक जण जखमी झाल्याची माहिती हाती आली आहे.

pune accident
११ वर्षांआधी केदारनाथमधील पुरात साथ सुटली, कुटुंबीयांकडून प्रतिमात्मक अंत्यसंस्कार; अचानक मनोरुग्णालयातून फोन खणखणला अन्...

अपघात झाल्यानंतर पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलं. किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात तातडीने उपचार सुरु करण्यात आले. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे वाहन थेट डिव्हायडरला धडकलं. त्यामुळे वाहनाचा अपघात झाला. या अपघातात वाहनाचं मोठं नुकसान झालंय. अपघातांचं सत्र थांबत नसल्याने पुणेकरांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.

महिला नेत्याचा अपघाती मृत्यू

अजित पवार गटाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष नेत्याचे अपघाती निधन झालं. गडचिरोलीत पाचगावजवळ भीषण दुर्घटना घडली. या अपघात पतीसह चालक गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री उशिरा साडेबारा वाजता पाचगाव जवळून जाताना दुभाजक ओलांडताना वेगवान वाहनाने त्यांच्या कारला मागून भीषण धडक दिली. गीता सुशील हिंगे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिला नेत्याचे नाव आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com