औद्योगिक केंद्र असलेल्या चाकणमध्ये खड्ड्यांमुळे शेकडो जणांचा जीव गेल्यानंतर आता उद्योजकांनी मोठा निर्णय घेतलाय. MIDCतील पायाभूत सुविधांच्या अभावामुळे 20 उद्योगांनी खंडाळा MIDCमध्ये स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
रोजची वाहतूक कोंडी, खराब रस्ते आणि अपघातांमुळे कंपन्यांच्या उत्पादनांवर मोठा परीणाम होतोय. या कंपन्या गेल्यास सुमारे एक हजार कोटींच्या उलाढालीवर परिणाम होणार आहे. त्यासोबतच 4 हजार कामगारांच्या रोजगारावर संकट येण्याची शक्यता आहे. चाकण आणि पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्रातील अपुऱ्या पायाभूत सुविधांमुळे अपघातांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जानेवारी 2025 ते जुलै 2026 या कालवधीत 580 जणांचा मृत्यू झाला आहे.
चाकणमधील या ज्वलंत समस्येवरुन खासदार अमोल कोल्हेंनी अधिकाऱ्यांवर निशाणा साधलाय. 59 कोटी रुपयांचं रस्त्याचं टेंडर निघूनही खड्डे बुजवले जात नाहीत, असा आरोप त्यांनी केला. खरतर केवळ चाकणच नाही तर खड्ड्यांची समस्या पुणे, मुंबईसह राज्यभरात आहे. नाशिकमध्ये तर खड्ड्यांच्या समस्येवरुन विशेष महासभा घ्यावी लागली. पण चाकणमध्ये खड्डयांमुळे कंपन्यांवर स्थलांतर करण्याची वेळ येत असेल तर ही यंत्रणेसाठी लाजीरवाणी गोष्ट आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.