Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला

Badlapur dahihandi accident : बदलापूरच्या माखन चोर दहीहंडी उत्सवादरम्यान मोठा अपघात घडला. सातव्या थरावर सलामी देत असतानाच अचानक सेफ्टी बेल्ट तुटला आणि चिमुकला गोविंदा खाली कोसळला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे .
Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला
Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळलाmeta ai
Published On

दहीहंडी सण जसा जवळ येतोय तसा गोविंदाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. गोविंदा सरावात गुंतले आहेत. थरावर थर रचत, नवे विक्रम करण्यासाठी सज्ज होत आहेत. अशातच बदलापूरमध्ये दहीहंडी सरावादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. माखन चोर या दहीकाला उत्सवा दरम्यान एक अपघात घडला. सातव्या स्तरावर चढलेला लहानगा गोविंदा सलामी देत असतानाच थेट खाली कोसळला सेफ्टी बेल्ट तुटल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले. यामुळे घटनास्थळी उपस्थित असणाऱ्या अनेकांना धडकी भरली.

बदलापूरमध्ये दहीहंडी उत्सवानिमित्त माखन चोर दही काला उत्सव आयोजित करण्यात आला होता. अनेक गोविंदा पथक या ठिकाणी थर रचण्याच्या तयारीत होते. मात्र अचानक उत्सव सुरू असतानाच सातव्या थरावरील गोविंदा थेट खाली कोसळला. जमलेल्या सर्वांच्याचा मनात धडकी भरली.

शिवसेना युवा सेना शहरप्रमुख मितेश धुळे यांच्या आयोजनातून या दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चोरहंडी फोडण्यासाठी प्रज्वल प्रतिष्ठानच्या माध्यमातून गोविंदांनी सात थरांची सलामी दिली. सातव्या थराला सलामी दिल्यानंतर अचानक सेफ्टी बेल्ट तुटला आणि सातव्या थरावर असलेला चिमुकला गोविंदा थेट खाली कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घटनास्थळी उपस्थित नागरिक आणि गोविंदांमध्ये काही काळ खळबळ उडाली. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे जमाव घाबरला.

Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला
Shocking : मुंबई हादरली! गरोदर गर्लफ्रेंडच्या कोल्ड्रिंक्समध्ये डांबर गोळ्या मिसळल्या; पुढे जे बॉयफ्रेंडने केलं ते भयंकर...

चिमुकला खाली कोसळताच त्याला तातडीनं सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं. त्याला उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात नेण्यात आले. दहीहंडी उत्सवात उंच थर रचताना गोविंदांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्टसह विविध सुरक्षा उपाययोजना केल्या जातात. मात्र, सातव्या थराला सलामी दिल्यानंतरच सेफ्टी बेल्ट तुटल्यानं सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल आहे. सण जवळ येत चालला आणि गोविंदा उंच मनोरे रचण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सुरक्षा यंत्रणा मजबूत असणे तितकेच महत्त्वाचे आहे.

या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या समोर आला असून, दहीहंडी उत्सवादरम्यान घडलेल्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे.

Badlapur : बदलापूरच्या दहीहंडीत मोठा अपघात; सलामी देत असतानाच सेफ्टी बेल्ट तुटला; सातव्या थरावरचा गोविंदा खाली कोसळला
Railway Rules : स्टेशनवर थुंकण्यापूर्वी किंवा कचरा टाकण्यापूर्वी १० वेळा विचार करा! रेल्वेने घेतला मोठा निर्णय
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com