Railway Rules : स्टेशनवर थुंकण्यापूर्वी किंवा कचरा टाकण्यापूर्वी १० वेळा विचार करा! रेल्वेने घेतला मोठा निर्णय

Railway New Rules Update : रेल्वे स्थानक आणि परिसरात कचरा फेकणे, थुंकणे यांसह अस्वच्छता केल्यास आता १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. दंड न भरल्यास न्यायालयीन कारवाई होऊ शकते.
Mumbai Railway Local News
Mumbai Railway Local NewsAI Image
Published On
Summary
  • रेल्वेचा मोठा निर्णय

  • स्थानकावर कचरा फेकणे किंवा थुंकणे आता महागात पडू शकते

  • दंड ५०० रुपयांवरून १,००० रुपये करण्यात आला

  • दंड न भरल्यास संबंधित व्यक्तीला न्यायालयात खेचणार

रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल आणि स्टेशनवर कचरा फेकलात किंवा थुंकलात तर मोठा भुर्दंड बसणार आहे. रेल्वे स्थानक आणि परिसरात अस्वच्छता करणाऱ्या प्रवाशांसाठी आता नियम अधिक कडक करण्यात आले आहेत. थुंकणे, कचरा टाकणे यांसारख्या प्रकारांसाठी आकारण्यात येणारा दंड दुप्पट करण्यात आला असून, आता संबंधित व्यक्तीला ५०० रुपयांऐवजी १ हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. विशेष म्हणजे, दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास संबंधित व्यक्तीला सक्षम न्यायालयासमोर हजर केले जाऊ शकते.

दररोज लाखो प्रवासी रेल्वे स्थानकांचा वापर करतात. त्यामुळे स्थानक परिसरात कचरा टाकणे, थुंकणे तसेच इतर प्रकारे अस्वच्छता केल्याने रेल्वेच्या स्वच्छता व्यवस्थेवर मोठा ताण पडतो. प्रवाशांनी स्वच्छतेचे नियम पाळावेत आणि सार्वजनिक ठिकाणांचा जबाबदारीने वापर करावा, यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आली आहे. भारतीय रेल्वेच्या परिसरातील स्वच्छतेवर परिणाम करणाऱ्या विविध कृतींसाठी शास्ती सुधारणा नियम, २०२६ नुकतेच राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या नव्या नियमांनुसार अस्वच्छता करणाऱ्यांवरील आर्थिक दंड वाढवण्यात आला आहे. त्यामुळे रेल्वे परिसरात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना आता पूर्वीपेक्षा अधिक आर्थिक फटका बसणार आहे.

Mumbai Railway Local News
Amla Benefits : केसांपासून ते पचनापर्यंत होतील 'हे' ६ फायदे, आवळ्याचा ज्यूस १५ दिवस रोज पिऊन पाहा

केवळ दंडाची रक्कम वाढवून रेल्वे प्रशासन थांबलेले नाही. संबंधित व्यक्तीने १ हजार चा दंड भरला नाही तर, त्याला सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. न्यायालयाला अशा प्रकरणात संबंधित व्यक्तीवर २ हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचा अधिकार असेल.

Mumbai Railway Local News
Cucumber Benefits : काकडी सोलायची की नाही? ९०% लोक करतात ही चूक; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत

'हे' प्रकार केल्यास भरावा लागणार दंड

  • कचरापेटीशिवाय कचरा फेकणे

  • रेल्वे परिसरात स्वयंपाक करून धोका निर्माण करणे

  • रेल्वे परिसरात अंघोळ करणे किंवा कपडे धुणे

  • रेल्वे परिसरात थुंकणे

  • उघड्यावर लघुशंका किंवा शौच करणे

  • प्राणी किंवा पक्ष्यांना अन्न देणे

  • रेल्वे परिसरात वाहने धुणे

  • रेल्वेच्या हद्दीत अनधिकृतपणे सामान ठेवणे

  • रेल्वे परिसरात पोस्टर लावणे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com