Alisha Khedekar
काकडीची साल फायबर आणि काही पोषक घटकांनी समृद्ध असते, त्यामुळे शक्यतो सालासह खा.
सालासह खाणार असाल तर काकडी पाण्याखाली व्यवस्थित घासून धुणे खूप महत्त्वाचे आहे.
काकडीच्या सालीत फायबर असते, जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करते.
सालीत व्हिटॅमिन्स आणि वनस्पतीजन्य घटक असतात, त्यामुळे काकडी सोलल्यास काही पोषण कमी होऊ शकते.
काकडी घेताना जाड, ताजी आणि डाग नसलेली निवडा. मऊ किंवा खराब भाग असलेली काकडी टाळा.
काकडीत पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी ती आहारात समाविष्ट करता येते.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा