आवाज कमी करा, मोठा करा पण एकदा काय ते ठरवा! पुणे महापालिकेतील गणेश मंडळाच्या बैठकीत काय घडलं?

Pune Ganesh Mandals Dj Sound Curbs Plasma Ban Meeting 2026: पुणे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या बैठकीत डीजे, ढोल-ताशा आणि ध्वनी निर्बंधांवर जोरदार वाद झाला. गणेश मंडळांनी प्लाझ्माला बंदी देण्याचा निर्णय घेतला असून एक खिडकी योजना, स्पीकर वेळेत शिथिलता आणि डिजिटल मॅपिंगचे मोठे निर्णय जाहीर करण्यात आले.
Pune Ganesh Mandals protest against DJ sound restrictions
Pune Ganesh Mandals protest against DJ sound restrictionssaam tv
Published On

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज पुणे महानगरपालिकेत गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये बैठक पार पडली. या बैठकीला महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त, नवल किशोर राम, पोलीस सह आयुक्त संजय दराडे यासह प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि पुणे शहरातील विविध भागातील गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत गणेशोत्सवात वाजवल्या जाणाऱ्या डीजे बाबत प्रामुख्याने चर्चा झाली. यावर सर्व गणेश मंडळांनी यंदाच्या गणेशोत्सवात प्लाझ्मा वर बंदी आणण्यासाठी एकमताने मंजुरी दिली. गणेशोत्सवाच्या काळात मंडळांना येणाऱ्या समस्या, उत्सवाचे आयोजन, विसर्जन मिरवणुकीच्या वेळा तसेच डीजे आणि ढोल ताशांच्या वर लागलेले निर्बंध यावर सुद्धा गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी आपले म्हणणे स्पष्ट केली. या बैठकीत महापालिका आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा त्यांची भूमिका जाहीर केली.

Pune Ganesh Mandals protest against DJ sound restrictions
केंद्रीय मंत्री अन् उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याची भेट; राजकारणात घडामोडींना वेग

डी जे, ढोल ताशा कायमचं बंद करा, पर्यावरण प्रेमीच्या मागणीवर कार्यकर्त्यांनी केला हल्लाबोल

बैठकीच्या पहिल्याच प्रश्नामुळे महापालिकेत गदारोळ झाला. एका पर्यावरण प्रेमीने डी जे आणि ढोल ताशा पथकावर कायमची बंदी आणा अशी मागणी करताच मंडळांचे कार्यकर्त्याने या मागणीला कडाडून विरोध केला. "मी पुण्यातील नारायण पेठेत राहतो गणेश उत्सवात वापरला जाणारा डीजे आणि ढोल ताशा २४ तास आणि कायमस्वरूपी बंद करा," असे उद्गार या पर्यावरण प्रेमीने करताच, गणेश मंडळांच्या कार्यकर्ते शब्दशः त्याच्यावर तुटून पडले. वेळीच महापालिका सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप केला आणि संबंधित व्यक्तीला बाहेर काढले.

Pune Ganesh Mandals protest against DJ sound restrictions
मोठी बातमी! KDMC रुग्णालयांमध्ये मोठा फेरबदल; ९ डॉक्टरांच्या तडकाफडकी बदल्या

दरवर्षी एकच चर्चा! काय तो निर्णय लावून टाका! मंडळांकडून प्रशासनाला मागणी

एकदा काय ते ठरावच! आवाज कमी करा मोठा करा! दरवर्षी एकच गोष्टीवर चर्चा होत असते. ज्यांना ज्यांना त्रास होतो त्यांनी बाहेर जाऊन राहावं त्यांच्या सगळ्यांची आम्ही व्यवस्था करू," अशी संतप्त प्रतिक्रिया एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने दिली. बैठकीत गणेशोत्सवात लागणाऱ्या डी जे साउंड सिस्टिम वर सुद्धा विविध प्रतिक्रिया उमटल्या. "४ बेस ४ टॉप लावायचा आणि डी जे वर निर्बंध हा विषय फक्त परिमंडळ १ मधून कसा आला? नागपूरमधून ४००० ढोल वाजवले मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मग ध्वनी प्रदूषण झालं नाही का? असा सवाल करायला सुद्धा कार्यकर्ते मागे राहिले नाही."

Pune Ganesh Mandals protest against DJ sound restrictions
Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी; 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ

पोलिस प्रशासनाकडून कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला जातो. आमचे ट्रॅक्टर फोडले जातात, कार्यकर्त्याला मान मिळालाच पाहिजे. स्पीकर वर निर्बंध आणण्यापेक्षा दारू बंदी करा तळीराम यांच्यावर निर्बंध आणा, असा सल्ला एका कार्यकर्त्याने दिला. आपल्याकडे असलेले डेसिबल मीटर ग्राह्य नाही मग कार्यकर्त्यांवर कुठल्या अनुषंगाने गुन्हे दाखल केले जातात का. २०२४ ते २६ मधील ज्या ४५२८ गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेतलेले नाहीत. कार्यकर्त्यांना वेठीस ठरलं जात आहे. गणेश मंडळांवर नियम लाधू नका, अशी प्रतिक्रिया एका कार्यकर्त्याने दिली.

प्लाझ्मा बंदीवर गणेश मंडळांची एकी

हा उत्सव संपत चालला आहे. १० दिवसांपैकी ५ दिवस साउंड १० वाजता बंद होतात. साउंड बद्दल निर्बंध लावायची पोलिस उपआयुक्त यांना अचानक उपरती कुठून आली? पुणे महापालिका एक भूमिका का नाही घेत? १ खिडकी अंतर्गत एक कायमस्वरूपी नियमावली बनवण्याची गरज असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं.

"कोणी ही प्लाझ्मा लावणार नाही ही गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे. डी जे वर चढून वेड्या वाकड्या स्टाईल ने नाचणाऱ्या कार्यकर्त्यांवर कारवाई करा," अशी भूमिका सुद्धा यावेळी कार्यकर्त्यांनी एकमुखाने घेतली.

मुंबईची घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची काळजी घ्या

मुंबईत एका प्रसिद्ध मंडळाची मूर्ती कोसळली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला. या विषयाला अनुसरून एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने बैठकीत सूचना केल्या. "मुंबईच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर, आगामी गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरातील सर्व खड्डे बुजवावे आणि तारा काढून घ्यायला पाहिजे जेणेकरून अशा दुर्दैवी घटना होणार नाहीत," अशी सूचना यावेळी करण्यात आली. गणेश मंडळाच्या प्रतिनिधींनी मांडलेल्या भूमिका, तक्रारी, समस्या ऐकून घेतल्यानंतर पुणे शहर पोलिस दलाचे सह आयुक्त संजय दराडे यांनी भाष्य केलं. "गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे सगळे सुख दुःख मला माहिती आहेत. गणेश आगमन रोजी सगळ्या मंडळांना आवाहन आहे की गणेश आगमनाची सगळी माहिती पोलिसांना द्यावी. गणेशोत्सवात सी सी टिव्ही, महिलांसाठी वेगळी रांग, सुरक्षा, स्वयंसेवक या सगळ्या गोष्टीची काळजी मंडळाने घेण्यात यावी. परवाना साठी एक खिडकी योजना लवकरच सुरू केली जाणार आहे. शेवटच्या ५ दिवसांसाठी स्पीकर वेळेबाबत शिथिलता आणली आहे." "प्लाझ्मा आणि लेसर असलेले डी जे लावणार नाहीत ही सगळ्या मंडळांनी घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहेत. गणेशोत्सवातील डी जे बाबत आम्ही एक निर्णय लवकरच घेण्यात येईल. ऐतिहासिक परंपरा आहे, पोलिस गणेश मंडळांसोबत आहोत," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याला त्रास झाला नाही पाहिजे. नियमावली असली पाहिजे परंतु निर्बंध नसावेत. मंडळांनी सांगितलं की प्लाझ्मा लावणार नाहीत म्हणजे नाही लावणार फक्त किती बेस किती टॉप लावायचे या बाबत आम्ही पोलिसांच्या निर्णयाची वाट बघतोय," अशी प्रतिक्रिया या सभेच्या अध्यक्षा महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिली.

या बैठकीत महापौर यांनी गणेश मंडळांसाठी एक खिडकी योजना जाहीर केली. या योजनेतून सगळे आवश्यक परवाने शहरातील सगळ्या गणेश मंडळांना मिळतील अशी माहिती महापौर यांनी दिली. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात गणेश मंडळाच्या तक्रारीसाठी एक नोडल ऑफिसर नेमला जाणार आहेत. त्यांना येणाऱ्या समस्या ते या अधिकाऱ्याकडे नोंदवू शकणार आहेत.

पुण्यातील गणेशोत्सवात होणार डिजिटल मॅपिंग

एखाद्या गणेश भक्ताला कुठल्या गणेश मंडळाने कुठला देखावा केला आहे तसचं एखादं मंडळ कुठला भागात आहे याची माहिती सहजपणे उपलब्ध व्हावी यासाठी पुणे महापालिकेकडून यंदा डिजिटल मॅपिंग केलं जाणार आहे. प्रत्येक गणेश मंडळाने त्यांची संपूर्ण माहिती महापालिकेकडे नोंदवायची आहे. कुठल्या रस्त्यावर कुठले मंडळ आहेत. एखाद्या मंडळाने यंदा काय देखावा केला आहे, त्याची जागा कुठे आहे, तिथे जायचं कसं, हे या मॅपिंग मधून नागरिकांना समजणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com