मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून रविवार, दिनांक १२ जुलै २०२६ रोजी उपनगरीय मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी हा ब्लॉक घेतला जाणार असून, याचा परिणाम मेन लाईन आणि हार्बर लाईनवरील लोकल सेवांवर होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहारदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या काळात CSMTहून सुटणाऱ्या डाऊन धीम्या गाड्या जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबतील. तसेच घाटकोपरहून CSMTकडे जाणाऱ्या अप धीम्या गाड्यांनाही जलद मार्गावर वळवण्यात येईल.
CSMT ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर लाईनवर सकाळी ११.४० ते दुपारी ४.४० आणि अप मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक राहणार आहे. या कालावधीत CSMTहून वाशी, बेलापूर, पनवेल तसेच वांद्रे आणि गोरेगावकडे जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच पनवेल, बेलापूर, वाशी आणि वांद्रे, गोरेगाव येथून CSMTकडे येणाऱ्या सेवाही बंद राहतील.
ब्लॉकदरम्यान पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान दर २० मिनिटांनी विशेष लोकल सेवा चालवल्या जाणार आहेत. याशिवाय सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हार्बर लाईनवरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
रेल्वे प्रशासनाचे स्पष्टीकरण
पायाभूत सुविधांची देखभाल आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी हे काम आवश्यक असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त करण्यात आली आहे. मुंबईकरांनी या दिवशी प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी मार्गांचा विचार करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.