Mumbai Local: ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडला, लोकलखाली चिरडून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार

Mumbai Local Accident: लोकल पकडताना प्रवासी रुळावर पडला. लोकलखाली चिरडून ७३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.
Mumbai Local: ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडले, लोकलखाली चिरडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू; घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार
Mumbai Local AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • घाटकोपर स्टेशनवर भीषण अपघात

  • लोकलमध्ये चढताना प्रवासी रुळावर पडला

  • लोकलखाली चिरडून ७३ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला

  • रेल्वे पोलिसांकडून अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली

मुंबईमध्ये लोकलच्या धडकेत एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. बाळसुब्रमण्यम अय्यर असं मृत्यू झालेल्या ७३ वर्षीय व्यक्तीचे नाव होते. ते चेंबूर येथे राहत होते. घाटकोपर रेल्वे स्थाकावर लोकल पकडण्यासाठी ते प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर आले. पण लोकलची धडक बसल्याने ते रुळावर पडले. लोकलखाली आपल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी सकाळी ६.३५ वाजता ही घटना घडली. घाटकोपर रेल्वे स्थाकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर धीमी लोकल पकडण्यासाठी बाळसुब्रमण्यम अय्यर आले होते. लोकल चढत असताना त्याला लोकलची धडक लागली. रुळावर पडल्यानंतर त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आणि जास्त रक्तस्राव होऊ लागला. या अपघातामध्ये त्यांचा उजवा पाय देखील तुटला. या घटनेमुळे घाटकोपर रेल्वे स्थानकावर काही काळ गोंधळाचे वातावरण होते.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडले, लोकलखाली चिरडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू; घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार
Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी त्यांना तात्काळ राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण डॉक्टरांनी सकाळी ६.५८ वाजता त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली. त्यांच्याजवळ कोणतीही वस्तू किंवा ओळखपत्र सापडले नाही. पोलिसांनी त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. नंतर पोस्टमॉर्टम करून त्यांचा मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडले, लोकलखाली चिरडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू; घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार
Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत, लोकलसेवा ३० मिनिटं उशिराने; प्रवाशांची तुफान गर्दी, पाहा VIDEO

दरम्यान, मुंबईत ९ एप्रिल रोजी धावत्या लोकलमधून पडून ७१ वर्षीय व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. किर्ती वीरा असं या व्यावसायिकाचे नाव होते. मुलुंड रेल्वे स्थानकावर ही घटना घडली होती. लोकल पकडत असताना त्यांचा हात सुटला आणि ते खाली पडले. लोकलसोबत फरफटत गेल्यामुळे त्यांचे पाय तुटले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढताना रुळावर पडले, लोकलखाली चिरडल्यामुळे वृद्धाचा मृत्यू; घाटकोपर रेल्वे स्थानकावर अपघाताचा थरार
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये मराठीला बंदी, मध्य रेल्वेचा मराठीद्वेष उघड

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com