Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

Mumbai Local Accident: भाईंदर रेल्वे स्थानकावर भयंकर अपघात झाला. लोकलमध्ये चढताना रुळावर पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. लोकलखाली चिरडल्यामुळे या तरुणाच्या शरीराचे तुकडे झाले. या अपघातामुळे काहीकाळ रेल्वेसेवा विस्कळीत झाली होती.
Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Mumbai Local AccidentSaam Tv
Published On

Summary -

  • भाईंदर रेल्वे स्टेशनवर दुर्दैवी घटना

  • लोकलमध्ये चढताना तरुण रुळावर पडला

  • लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

  • गर्दीमुळे अपघात झाल्याची शक्यता

मनोज तांबे, मिरा-भाईंदर

कामावर निघालेल्या तरुणाचा लोकलखाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली. भाईंदर रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी ही घटना घडली. हा तरुण प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करत होता. पण तोल जाऊन तो रुळावर पडला. त्याचवेळी लोकलखाली चिरडून त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भाईंदर रेल्वे स्थानकावर काही काह गोंधळाचे वातावरण होते.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून लोकलमध्ये चढताना तरुण रेल्वेरुळात पडला. लोकलने त्याला धडक दिल्यामुळे या प्रवाशाचा मृत्यू झाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी मीरा-भाईंदर परिसरातून मोठ्या संख्येने नोकरदार मुंबईकडे प्रवास करत असताना याचवेळी ही दुर्घटना घडली. या घटनेनंतर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील रेल्वेसेवा काही काळ खोळंबली होती. पण तरुणाचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर रेल्वेसेवा पुन्हा सुरळीत झाली.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Mumbai Local : धक्कादायक! बदलापूर लोकलवर दगडफेक, महिला प्रवाशाच्या डोळ्यावर वार, रक्ताने तोंड माखलं

पोलिसांनी सांगितले की, प्रवाशांची प्रचंड गर्दी असल्यामुळे गोंधळाच्या परिस्थितीत हा अपघात झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामध्ये तरुणाच्या शरीराचे तुकडे झाले. घटनेनंतर भाईंदर रेल्वे स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आहे. या तरुणाच मृतदेह ताब्यात घेत रेल्वे पोलिसांनी शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. पोलिस मृतदेहाची ओळख पटवत आहेत.

Mumbai Local: ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात रुळावर पडला, लोकलखाली चिरडून तरुणाचा मृत्यू
Mumbai Local Train: पश्चिम रेल्वे मार्गावरील जम्बो ब्लॉकमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल; 300 लोकल गाड्या रद्द

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com