ड्रग्स-वेश्या व्यवसायाची भीती दाखवली; मुंबईतल्या विवाहित महिलेला बोगस पोलिसांनी गंडवलं

Fake Police Scam In Mumbai: मुंबईत बनावट पोलिसांनी गृहिणीला ड्रग्स आणि वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत २ लाखांची उकळपट्टी केली.
Mumbai Police arrested five accused for posing as fake cops and extorting ₹2 lakh from a housewife through online threats.
Mumbai Police arrested five accused for posing as fake cops and extorting ₹2 lakh from a housewife through online threats.Saam Tv
Published On

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईतील आरे पोलिसांनी पोलिस असल्याची खोटी बतावणी करून एका गृहिणीला धमकावत ऑनलाइन पद्धतीने तब्बल २ लाख रुपयांची उकळपट्टी करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. या टोळीत दोन महिलांचाही समावेश असून त्यांनी भीतीचे वातावरण निर्माण करून पैशांची मागणी केल्याचे तपासात समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी महिलेशी संपर्क साधला. त्यांनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगून महिलेला काही कायदेशीर कारवाईची भीती दाखवली. ड्रग्स तसेच वेश्या व्यवसायाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत धमकावले. तसेच तिच्या नावावर गंभीर गुन्हा दाखल होऊ शकतो अशी धमकी देत तिच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला.

Mumbai Police arrested five accused for posing as fake cops and extorting ₹2 lakh from a housewife through online threats.
Mumbai Mega Block: मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी, रविवारी रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

आरोपींनी महिलेला एक लिंक पाठवून त्यावरून पैसे भरण्यास भाग पाडले. भीतीपोटी महिलेने टप्प्याटप्प्याने सुमारे २ लाख रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. नंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने आरे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३१८(४), ३१९(२), ३४ अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने तांत्रिक तपास करत बँक व्यवहार आणि मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढला.

Mumbai Police arrested five accused for posing as fake cops and extorting ₹2 lakh from a housewife through online threats.
Aditya Thackeray News | भर मंचावरुन आदित्य ठाकरे यांनी Cm Eknath Shinde यांची ॲक्टींग केली

तपासादरम्यान पोलिसांनी फरहान मुस्तफा कादरी (३३) याला २६ मार्च २०२६ रोजी अटक केली. त्याच्या चौकशीत इतर साथीदारांची माहिती मिळाल्यानंतर स्वप्नाली सुनील नाईक (३८), कविता अजय यादव (४०), राऊद सूर्यकांत कांबळी (४४), प्रवीण मृत्युञ्जय पाठक (३६) आणि परिक मोंगीलाल वेवारे (५०) यांना देखील अटक करण्यात आली. पोलिसांच्या तपासात ही टोळी इतर महिलांनाही अशाच प्रकारे धमकावून पैसे उकळत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली महेश चिमटे, डीसीपी परिमंडळ-१२, विजय भिसे, सहायक पोलीस आयुक्त आरे विभाग आणि रवींद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक आरे पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली मंगेश अंधारे पोलीस निरीक्षक (गुन्हे), गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पांचाळ, पोलीस हवालदार नागरे, महाले पोलीस शिपाई बरकडे आणि पोलिस हवालदार गणेश पाटील या आरे पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com