Mumbai news
Mumbai crime news Saam tv

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; 44 कोटींचे ड्रग्स जप्त, ९ जण असे अडकले जाळ्यात

Mumbai crime news : मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आलीये. विमानतळावर एकूण 44 कोटींचे ड्रग्स जप्त करण्यात आलेय.
Published on

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई विमानतळावर मोठी कारवाई करण्यात आली आहे . मुंबई कस्टम्स झोन–III अंतर्गत विमानतळ आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी 24 फेब्रुवारी 2026 ते 2 मार्च 2026 या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या मोहिमेअंतर्गत अंमलीपदार्थ, परकीय चलन, हिरे आणि सोन्याच्या दागिन्यांची मोठी जप्ती केली. स्पॉट आणि APIS प्रोफाइलिंगच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

या कालावधीत 8 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये एकूण 44.292 किलो हायड्रोपोनिक अंमली पदार्थ (NDPS पदार्थ) जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थाची किंमत सुमारे 44.292 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आलंय. बँकॉकहून मुंबईत आलेल्या 9 प्रवाशांकडून हा साठा जप्त करण्यात आला आहे. त्यांना एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली आहे. याशिवाय 299 ग्रॅम मेथाक्वालोन (NDPS पदार्थ) देखील जप्त करण्यात आले आहेत. त्याची अवैध बाजारातील किंमत अंदाजे 74 लाख 75 हजार रुपये आहे.

दरम्यान, अन्य 5 प्रकरणांत 5 प्रवाशांकडून परकीय आणि भारतीय चलन मिळून 32 लाख 85 हजार 668 रुपयांच्या समतुल्य रक्कम जप्त करण्यात आली. तसेच 455 कॅरेट नैसर्गिक आणि लॅब-ग्रोन हिरे (किंमत 94 लाख 97 हजार 300 रुपये), 21 कॅरेट तुटलेले सोन्याचे दागिने (160.790 ग्रॅम, किंमत 21 लाख 51 हजार 473 रुपये) आणि 1203.69 कॅरेट कट आणि पॉलिश्ड नैसर्गिक पाचू, माणिक, नीलम, अॅमेथिस्ट, प्रासिओलाइट आणि इतर मौल्यवान रत्ने (किंमत 15 लाख 16 हजार 127 रुपये) जप्त करण्यात आली.

मुंबई विमानतळ कस्टम्स विभागाकडून सुरू असलेल्या कडक तपासणीमुळे अमली पदार्थ आणि तस्करीविरोधातील कारवाईला वेग आला असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com